Agriculture news in marathi Take out insurance, otherwise the market committees will close | Agrowon

विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद करू 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व विभाग आणि कर्मचारी कोरोनाशी मुकाबला करत असताना, आता बाजार समिती कर्मचारी संघाने राज्य सरकारला समित्या बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व विभाग आणि कर्मचारी कोरोनाशी मुकाबला करत असताना, आता बाजार समिती कर्मचारी संघाने राज्य सरकारला समित्या बंद करण्याचा इशारा दिला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा अन्यथा बाजार बंद करू, असे निवेदन संघाच्या वतीने पणन संचालकांना देण्यात आले आहे. 

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा विळखा देशाला आणि राज्याला पडला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक घटक कोरोनाशी लढत आहेत. कोरोना संकटात शेतीमाल पुरवठा साखळी सुरळीत राहून शेतीमालाचे नुकसान होऊ नये आणि नागरिकांची देखील भूक भागली जावी यासाठी शेतीमाल वाहतुकीसह बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या स्थितीत सर्वच बाजार घटक कोरोनाशी लढत आहेत. यामध्ये शेतकरी, बाजार समिती कर्मचारी, हमाल, तोलणार, कामगार, शेतीमाल वाहतूक करणारे वाहन चालक आदी विविध घटक कार्यरत आहेत. 

राज्यात सात हजार कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता बाजार समित्यांमध्ये सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समित्यांमध्ये फळे, भाजीपाला व भुसार लिलावाचे कामकाज करीत आहे. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे पणन संचालक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत किशोर सुभाष चव्हाण या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबांस शासनामार्फत कोणतीही मदत अथवा विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

बाजार समिती कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करत असताना सुद्धा शासनाने त्यांना विमा कवच दिलेले नाही. तरी महाराष्ट्रातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचा विमा व इतर सुविधा तत्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी पणन संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कर्मचारी कोरोना बाधित होऊन जीवितास मुकले. त्यांच्या पश्चात कुटुंबियांना बाजार समिती व्यवस्थापन व शासनाने कुठली मदत तर दूर साधी विचारणा केलेली नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहोत. अन्न साखळी सुरक्षित राहील यास बांधील आहोत. मात्र, शासनाने इतर अत्यावश्यक सेवेतील घटकांप्रमाणे आमचा विचार करावा. बाजार समिती कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही भूमिका घेतली आहे. 
- दिलीप डेबरे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे 

वैयक्तिक विमा उतरवू शकतात. 
प्रत्येक बाजार समिती आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना राबवीत आहे. त्या योजनेमध्ये विविध आजारांचा समावेश आहे. तसेच आता कोरोना विमा योजना सुरू आहे. ती विमा पॉलिसी प्रत्येक कर्मचारी वैयक्तिकरीत्या काढू शकतो. त्यामुळे ५० लाखांच्या विम्याची योजना सध्या तरी विचाराधीन नसल्याचे पणन संचालनालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...