दुष्काळ निवारणार्थ प्राधान्याने उपाययोजना करा ः डाॅ. भापकर
दुष्काळ निवारणार्थ प्राधान्याने उपाययोजना करा ः डाॅ. भापकर

दुष्काळ निवारणार्थ प्राधान्याने उपाययोजना करा ः डाॅ. भापकर

परभणी ः टंचाई, दुष्काळ निवारण आणि रोजगाराच्या उपलब्धतेसाठी प्रशासनातील सर्व घटकांनी प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश विभागाचे आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.

मंगळवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाई, चाराटंचाई पीकविमा, पीककर्ज, मग्रारोहयोच्या कामांचे नियोजन, दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा विभागीय डॉ. भापकर यांनी घेतला या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य वन संरक्षक महाजन, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डाॅ. भापकर म्हणाले, जिल्ह्यातील मजुरांचे रोजगारासाठी सुरू असलेले स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगाअंतर्गत रोजगारासाठी विविध कामे सुरू झाली पाहिजेत. सिंचन विहिरी आणि शेततळ्याचा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबवावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घ्यावा. कृषी विभागाने प्रभावीपणे योजना राबविण्याची गरज आहे. चाराटंचाईचा नियमित आढावा घेऊन लागणाऱ्या चाऱ्याचे नियोजन करण्यात यावे. पशुधनाला कोणत्याही परिस्थितीत चारा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com