agriculture news in marathi, Take timely measures on the Army warm: Ajay Mitkari | Agrowon

लष्करी अळीवर वेळीच योग्य उपाय करा : अजय मिटकरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

 जालना : ‘‘लष्करी अळीचा जीवनक्रम ओळखण्याची गरज आहे. अळीच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास करावा. पीक फेरपालट व वनस्पतिजन्य कीटकनाशकांच्या वापरावर भर द्यावा. दहा टक्‍क्‍यांहून जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास स्पायनेटोरम किंवा थायामेथोक्‍झाम अधिक लॅम्डा सायलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) यांपैकी कीटकनाशकाची सुरक्षित पोषाख परिधान करून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी दिला.

 जालना : ‘‘लष्करी अळीचा जीवनक्रम ओळखण्याची गरज आहे. अळीच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास करावा. पीक फेरपालट व वनस्पतिजन्य कीटकनाशकांच्या वापरावर भर द्यावा. दहा टक्‍क्‍यांहून जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास स्पायनेटोरम किंवा थायामेथोक्‍झाम अधिक लॅम्डा सायलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) यांपैकी कीटकनाशकाची सुरक्षित पोषाख परिधान करून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी दिला.

जिल्ह्यातील खरपूडी कृषी विज्ञान केंद्रातर्फे बदनापूर तालुक्‍यातील वरूडी येथे मक्‍यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात आली. 
निक्रा प्रकल्पांतर्गत लष्करी अळी व्यवस्थापाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्‍के, कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे, निक्रा प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहायक एस. बी. माने, कृषी सहायक के. यू. बनकर, वरुडीचे सरपंच दिगंबर भिसे, उपसरपंच राधाकिसन शिंदे आदी उपस्थित होते. 

कोकाटे म्हणाले, ‘‘मक्‍यावर लष्करी अळी दिसून येताच कामगंध सापळे लावावेत. सुरवातीला ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.’’ 

डॉ. आगे म्हणाले, ‘‘भविष्यातील चाराटंचाईचे संकेत पाहता मका पिकाचा मुरघास तयार करावा. प्रती जनावर तीन टन मुरघास करावा. त्यासाठी किमान ८ ते १० गुंठे मका लागवड करावी.’’ 

दरम्यान, मका पिकात कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. एस. बी. माने यांनी सूत्रसंचालन केले. 

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...