गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन विभागांनी ‘एसओपी’ तयार करावा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर: ‘‘गेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व विभागांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आठ दिवसांत विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी. पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीनुसार ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी सहकार्य करावे’’, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
Taking into account last year's experience, departments should prepare 'SOP': Guardian Minister Satej Patil
Taking into account last year's experience, departments should prepare 'SOP': Guardian Minister Satej Patil

कोल्हापूर : ‘‘गेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व विभागांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आठ दिवसांत विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी. पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीनुसार ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी सहकार्य करावे’’, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. 

पालकमंत्री पाटील यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. 

पाटील यांनी जिल्ह्यातील धरणांचा सध्याचा पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले,‘‘ जिल्ह्यातील बोटीधारकांची नोंद ठेवून यादी बनवावी. जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरुस्ती करून त्या सज्ज ठेवाव्या.ग्रामीण भागात विशेषतः: शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या होत्या. त्याबाबत तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा सर्वंच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी.’’ 

देसाई म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाने जूनच्या आत धरणांच्या दुरूस्तीबाबत विशेषत: फाटकवाडी, बर्की, धरणाच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावी. पावसाबाबत आणि उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी स्वतंत्रपणे एफएम वाहिनी सुरू करण्याचा विचार आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी गेल्यावेळी आलेल्या अडचणी आणि अल्पमुदतीत उपाययोजना करण्याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. पावसाबाबत पाटबंधारे विभागाने आगाऊ सूचना देण्याबाबत नियोजन करावे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com