तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

एका सज्जासाठी एक लॅपटॉप व एक प्रिंटर याप्रमाणे वाटप केले जाणार आहे. तलाठी व मंडलाधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ते लॅपटॉप व प्रिंटर त्याच सज्जाच्या ठिकाणी राहणार आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत सर्व तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप होईल. - संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप
तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

सोलापूर : राज्यातील महसूल प्रशासनाची यंत्रणा दिवसेंदिवस हायटेक होत आहे. राज्यातील तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाची लॅपटॉप व प्रिंटर खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये जिल्ह्यातील ४४८ तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप होणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्याधुनिक लॅपटॉप व प्रिंटर खरेदीसाठी प्रयत्न आहेत. नामांकित एचपी कंपनीचे आय-५, ८-जनरेशनचे लॅपटॉप देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ६४३ तलाठी व मंडलाधिकारी आहेत. या सर्वांना दोन टप्प्यात लॅपटॉप व प्रिंटर देण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांची ही खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.

पहिल्या टप्प्यात ४४८ लॅपटॉप व प्रिंटर दिल्यानंतर उर्वरित १९५ लॅपटॉप व प्रिंटर खरेदीसाठी साधारणतः सव्वा कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता भासणार आहे. हा निधी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्य सेतू समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. सात-बारा व फेरफारची कामे आता ऑनलाइन झाल्यामुळे तलाठी व मंडलाधिकारी यांचे काम येत्या काळात अधिक सोपे होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com