कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा नकार
नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित कामे करण्यास तलाठ्यांनी नकार दिला आहे. याबाबत तलाठी यापुढे ‘पीएम-किसान’चे काम करणार नाहीत.
नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित कामे करण्यास तलाठ्यांनी नकार दिला आहे. याबाबत तलाठी यापुढे ‘पीएम-किसान’चे काम करणार नाहीत. हे काम कृषी विभागामार्फत करून घेतले जावे, अशा मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा तलाठी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिले.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच पुणे येथे झाली. यात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ‘पीएम किसान’च्या विषयाला अनुसरून होणाऱ्या त्रासाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. तर योजनेचे कामकाज नाकारण्याबाबत मत व्यक्त करण्यात आले होते.
सद्यःस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी यांना महसूल विभागाची निगडित मूळ महसुली कामकाज करावे लागते. ज्यामध्ये निवडणुका, संजय गांधी योजनेचे लाभार्थी शोधणे, वसुली अशी अनेक कामे करावी लागत आहेत. यासह ७/१२ संगणीकरण, ई-चावडी योजना अंतिम टप्प्यात आहे.
यासह नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अनुदान वाटप सारखी कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर इतर कामकाजाशी निगडित असलेल्या अतिरिक्त कामाकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे नियोजित कामे वेळेत करण्यास विलंब होत आहे. या योजनेकडे पूर्ण क्षमेतेने योजनेच्या अनुषंगाने कामकाजाकडे पूर्ण क्षमेतेने लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे या पुढे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे काम देऊ नये, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस बाबासाहेब खेडकर, कार्याध्यक्ष एम. एल. पवार, अध्यक्ष नीळकंठ उगले आदींनी केली.
विनम्रपणे नकार
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या आदेशान्वये तलाठी व मंडळ अधिकारी हे १ मार्चपासून योजनेचे काम व संबंधित योजनेशी निगडित कोणतेही काम करणार नाहीत. विनम्रपणे हे काम नाकारत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
- 1 of 1098
- ››