पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर हाऊसवर झेंडा फडकवला

अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला जाणाऱ्या पंजशीर भागावर तालिबानने अखेर कब्जा मिळवला आहे. रेजिस्टेन्स फोर्सच्या बंडखोरांनी तालिबानचा कडवा प्रतिकार केला, पंरतु रविवारी प्रचंड संघर्षानंतर तालिबानने ताबा मिळवला.
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर हाऊसवर झेंडा फडकवला
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर हाऊसवर झेंडा फडकवला

काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला जाणाऱ्या पंजशीर भागावर तालिबानने अखेर कब्जा मिळवला आहे. रेजिस्टेन्स फोर्सच्या बंडखोरांनी तालिबानचा कडवा प्रतिकार केला, पंरतु रविवारी प्रचंड संघर्षानंतर तालिबानने ताबा मिळवला. तालिबानने पंजशीर गव्हर्नर हाऊसवर आपला झेंडाही फडकवला. पंजशीरवरील विजयाने तालिबानचे अफगाणिस्तानवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. गर्व्हनर हाऊसवरील झेंड्याचा व्हिडिओ तालिबानने व्हायरल केला आहे. दरम्यान, रेजिस्टेन्स फोर्सने तालिबानचा दावा फेटाळून लावला असून संघर्ष सुरूच राहिल, असे म्हटले आहे.  तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिदने म्हटले, की अफगाणिस्तानात तालिबानला आव्हान देणाऱ्या शेवटच्या गडाचा पाडाव झाला आहे. आता देश युद्धाच्या चक्रातून बाहेर आला आहे. देशातील नागरिकांच्या पाठिंब्यावर देशाला सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना ईश्‍वराच्या कृपेने यश आले आहे. काल रेजिस्टेन्स फोर्स कमकुवत असल्याचे वृत्त येत होते आणि अहमद मसूदने तालिबानसमोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मांडला होता. तत्पूर्वी त्याने पंजशीर आणि अंदराब येथे तालिबानचा हल्ला रोखण्याची अट घातली होती. परंतु तालिबानची स्थिती मजबूत असल्याने दहशतवादी कोणत्याही स्थितीत पंजशीवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मसुदने युद्ध छेडल्याने तालिबानचे दहशतवादी चिडलेले होते. या बळावरच तालिबानने पंजशीवर ताबा मिळवला.  तालिबान म्हणतात सालेह पळाले  अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी देशातून पळ काढल्याचा दावा तालिबानने आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. सालेह नॅशनल रेसिस्टेंन्स (एनआरएफ) बरोबर होते.जबिहुल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत म्हटले की, सालेह हे अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानला पळाले आहेत. पंजशीरवर आतापर्यंत नियंत्रण ठेवणारे गायब आहेत, असेही तालिबानचा प्रवक्ता म्हणाला. अफगाणिस्तान हे त्यांचे घर असून ते केव्हाही येऊ शकतात. पंजशीरमध्ये जप्त केलेली शस्त्रे अफगाणिस्तानच्या शस्त्रसाठ्यात जमा केले जाणार आहेत, असेही मुजाहिदने म्हटले आहे.  तुम्ही कोठेही असा. आत किंवा बाहेर. देशाचा सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय उठाव करा. अहमद मसुद, एनआरएफच्या कमांडरची ऑडिओ क्लिप   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com