agriculture news in marathi Taliban control of Panjshir flag was hoisted on Governors House | Page 3 ||| Agrowon

पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर हाऊसवर झेंडा फडकवला

वृत्तसेवा
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला जाणाऱ्या पंजशीर भागावर तालिबानने अखेर कब्जा मिळवला आहे. रेजिस्टेन्स फोर्सच्या बंडखोरांनी तालिबानचा कडवा प्रतिकार केला, पंरतु रविवारी प्रचंड संघर्षानंतर तालिबानने ताबा मिळवला.

काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला जाणाऱ्या पंजशीर भागावर तालिबानने अखेर कब्जा मिळवला आहे. रेजिस्टेन्स फोर्सच्या बंडखोरांनी तालिबानचा कडवा प्रतिकार केला, पंरतु रविवारी प्रचंड संघर्षानंतर तालिबानने ताबा मिळवला. तालिबानने पंजशीर गव्हर्नर हाऊसवर आपला झेंडाही फडकवला.

पंजशीरवरील विजयाने तालिबानचे अफगाणिस्तानवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. गर्व्हनर हाऊसवरील झेंड्याचा व्हिडिओ तालिबानने व्हायरल केला आहे. दरम्यान, रेजिस्टेन्स फोर्सने तालिबानचा दावा फेटाळून लावला असून संघर्ष सुरूच राहिल, असे म्हटले आहे. 

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिदने म्हटले, की अफगाणिस्तानात तालिबानला आव्हान देणाऱ्या शेवटच्या गडाचा पाडाव झाला आहे. आता देश युद्धाच्या चक्रातून बाहेर आला आहे. देशातील नागरिकांच्या पाठिंब्यावर देशाला सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना ईश्‍वराच्या कृपेने यश आले आहे.

काल रेजिस्टेन्स फोर्स कमकुवत असल्याचे वृत्त येत होते आणि अहमद मसूदने तालिबानसमोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मांडला होता. तत्पूर्वी त्याने पंजशीर आणि अंदराब येथे तालिबानचा हल्ला रोखण्याची अट घातली होती. परंतु तालिबानची स्थिती मजबूत असल्याने दहशतवादी कोणत्याही स्थितीत पंजशीवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मसुदने युद्ध छेडल्याने तालिबानचे दहशतवादी चिडलेले होते. या बळावरच तालिबानने पंजशीवर ताबा मिळवला. 

तालिबान म्हणतात सालेह पळाले 
अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी देशातून पळ काढल्याचा दावा तालिबानने आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. सालेह नॅशनल रेसिस्टेंन्स (एनआरएफ) बरोबर होते.जबिहुल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत म्हटले की, सालेह हे अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानला पळाले आहेत. पंजशीरवर आतापर्यंत नियंत्रण ठेवणारे गायब आहेत, असेही तालिबानचा प्रवक्ता म्हणाला. अफगाणिस्तान हे त्यांचे घर असून ते केव्हाही येऊ शकतात. पंजशीरमध्ये जप्त केलेली शस्त्रे अफगाणिस्तानच्या शस्त्रसाठ्यात जमा केले जाणार आहेत, असेही मुजाहिदने म्हटले आहे. 
तुम्ही कोठेही असा. आत किंवा बाहेर. देशाचा सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय उठाव करा. अहमद मसुद, एनआरएफच्या कमांडरची ऑडिओ क्लिप 

 


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...