नाशिक : समृद्धीचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद

समृद्धीचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद
समृद्धीचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतराची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढण्यासह शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतराचा तिढा सोडविण्यात येईल, याबाबत समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक मंगळवारी (ता. २८) बोलविली होती. समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील कामाची प्रगती व यात येत असलेले अडथळे याचा आढावा त्यांनी घेतला. 

काही तांत्रिक अडचणी असतील, तर त्यातून मार्ग काढला जाईल. शिवाय यापूर्वी हस्तांतर करण्यात आलेल्या; परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल. महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.

पाणीक्षमता वाढीसाठी गाळउपसा

छोटे बंधारे, धरण, तलावांतील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. या वेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. अपेक्षित काम होत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते, अशी यादी ठेकेदारांना देण्यात येईल. त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. 

मोबदला देऊनही भूसंपादन प्रलंबित  सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतील मऱ्हळ बुद्रुक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. या जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केल्या आहेत, त्यांचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र काही जमिनीची मालकी अद्यापही शेतकऱ्यांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकऱ्यांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे. ते मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com