agriculture news in marathi, taluka administration ignores tankar demand, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात टॅंकर मागणी प्रस्तावांकडे केले जातेय दुर्लक्ष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018
सातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. 
 
सातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. 
 
गेल्या दोन ते चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवारअंतर्गत कामांमुळे जिल्ह्यातील टॅंकरग्रस्त गावेही जलस्वयंपूर्ण झाली आहेत. त्यामुळे एरव्ही दोनशे ते अडीचशे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण यावर्षी मे महिन्यात आतापर्यंत केवळ २९ टॅंकर सुरू झाले आहेत.
 
जलयुक्त शिवार तसेच स्वंयसेवी संस्थांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे पुढील वर्षी जिल्हा टॅंकरमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्‍यता आहे. सध्या खटाव, माण, कोरेगाव व खंडाळा तालुका वगळता उर्वरित महाबळेश्‍वर, पाटण, वाई, जावळी तालुक्‍यात झालेल्या पावसाचे पाणी अडविले नसल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
 
त्यामध्ये महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दोन, वाई तालुक्‍यातील तीन, पाटण तालुक्‍यातील दोन तर जावळी तालुक्‍यातील आठ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्‍याला बसत आहे. या तालुक्‍यात १२ गावे व ६४ वाड्यावस्त्यांवर आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
पाणी संरक्षित करण्यासाठी १५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील चार, खटाव तालुक्‍यातील एक, वाई तालुक्‍यातील एक, जावली तालुक्‍यातील पाच, महाबळेश्‍वरमधील चार विहिरींचा समावेश आहे. जलसंधारणांच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असली तरी उष्णतेत वाढ झाल्याने पाणीटंचाईत वाढ होऊ लागली आहे.
 
यामुळे अनेक गावांकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव येत आहेत. मात्र जलसंधारणाच्या कामांचा परिणाम दिसावा यासाठी तहसील पातळीवर या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. तालुकानिहाय टॅंकरची संख्या ः माण ८, खटाव ३, कोरेगाव ४, खंडाळा १, वाई ३, पाटण २, जावली ७, महाबळेश्‍वर १.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...