तळवडे येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको अांदोलन

तळवडे येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको अांदोलन
तळवडे येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको अांदोलन

आटपाडी, जि. सांगली : शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळिराजा शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. ९) तडवळे येथे आटपाडी- भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

शेत मालासह दुधाचे दर कोसळल्यामुळे राज्यभर विविध शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभर शेतकरी संपाची हाक दिली आहे. या संपाचे लोन आटपाडी तालुक्यातही पोचले. बळिराजा शेतकरी संघटनेने शनिवारी सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले. एक तास वाहतूक बंद केली होती. या वेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली; तसेच रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. बळिराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तडवळे शाखाध्यक्ष अमित गिडे, शिवाजी खिलारी आदींनी सहभाग घेतला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com