Agriculture news in Marathi tamarind and jowar Incoming decrease in Nagar | Agrowon

नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही चिंच, ज्वारीची आवक फारशी होताना दिसत नाही. आठवडाभरात साडे पाचशे क्विंटलची आवक होऊन चिंचेला मागील सप्ताहात शनिवारी (ता. १४) ८ हजार ७०० ते २३ हजार ४८९ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. ज्वारीची पावने सहाशे क्विंटलची आवक होऊन १९०० ते ३००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही चिंच, ज्वारीची आवक फारशी होताना दिसत नाही. आठवडाभरात साडे पाचशे क्विंटलची आवक होऊन चिंचेला मागील सप्ताहात शनिवारी (ता. १४) ८ हजार ७०० ते २३ हजार ४८९ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. ज्वारीची पावने सहाशे क्विंटलची आवक होऊन १९०० ते ३००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 

नगर बाजार समितीत फेब्रुवारी, मार्च महिन्यात ज्वारी, चिंचेची आवक होत असते. यंदा मात्र ज्वारी, चिंचेच्या उत्पादनात घट झाल्याने आवकेवरही परिणाम असल्याचे दिसत आहेत. बाजरीची १९६ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते दोन हजार, चिंचेच्या बोटकाची ५० क्विंटलची आवक होऊन पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची ६२४ क्विंटलची आवक होऊन तीन हजार शंभर ते ३४५१ रुपयाचा दर मिळाला तर तुरीची २२६ क्विंटलची आवक होऊन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. 

मुगाची १३ क्विंटलची आवक होऊन सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची चारशे सत्तावीस क्विंटलची आवक होऊन ५६२५ ते २१३४० रुपयाचा दर मिळाला. गव्हाची ३२४ क्विंटलची आवक होऊन १७०० ते १९०० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची पस्तीस क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. साडेसहाशे क्विंटलची आवक होऊन २८५० ते ३८०० रुपयांचा दर मिळाला असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 

भाजीपाल्याची आवक व दर स्थिर 
सोमवारी (ता. १६) टोमॅटोची १४१ क्विंटलची आवक होऊन शंभर ते पाचशे, वांगीची ३९ क्विंटलची आवक होऊन २०० ते १२००, फ्लॉवरची ४९ क्विंटलची आवक होऊन दोनशे ते एक हजार, काकडीची १३३ क्विंटलची आवक होऊन तीनशे ते एक हजार, गवारची ३९ क्विंटलची आवक होऊन दोन  हजार ते आठ हजार, कारल्याची पंधरा क्विंटलची आवक होऊन पाचशे ते अडीच हजार, भेंडीची २१ क्विंटलची आवक होऊन चार हजार ते सहा हजार, बटाट्याची २७६ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते दीड हजार, शेवग्याची वीस क्विंटलची आवक होऊन एक हजार ते चार हजार, सिमला मिरचीला १३०० ते २५०० रु. दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...