चिंचेच्या हंगामास प्रारंभ

चिंच
चिंच

सांगली ः तासगाव बाजार समिती चिंचेच्या सौद्यासाठी प्रसिद्ध आहे. चिंचेचा हंगाम सुरू झाला आहे. बाजार समितीत ४५० पोत्यांची म्हणजे २० ते २२ टनांची आवक होते आहे. चिंचेस ७००० ते ८२५० रुपये असा दर मिळत आहे. गतवर्षीपेक्षा हंगामाच्या प्रारंभी प्रतिक्विंटलला ५०० रुपये दर कमी मिळत आहे. मात्र,  पुढील काही दिवसांत दरात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. तासगाव ही चिंचेची पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ आहे. राज्यात तासगाव शिवाय बार्शी, नगर येथे चिंचेचे सौदे होतात. तासगाव ही जवळची बाजारपेठ असल्याने कर्नाटकातूनही चिंच तासगावात येते. दर बुधवारी चिंचेचे सौदे होतात. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चिंचेचे सौदे सुरू असतात. तासगाव बाजार समिती आवारात चिंचेचे खुले सौदे होतात. निपाणी, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील चिंचेचे व्यापारी चिंच विक्री आणि खरेदी करण्यासाठी तासगाव येथे येतात. तासगाव बाजारपेठेतून फोडलेल्या चिंचेप्रमाणे न फोडलेली चिंच, चिंचोके ही भारतातील अन्य राज्यांत पाठविले जातात. तासगावात विक्री झालेली चिंच निर्यातही होते. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात ३२७ टन चिंचेची आवक झाली होती. गेल्या वर्षीच्या हंगामात चिंचेला ९६५५ रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. मात्र, यंदा हंगामाच्या प्रारंभीच दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.  चिंचोका १७०० रुपये क्विंटल तासगाव बाजार समितीत चिंचोक्यांचीदेखील आवक होते. त्याला सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय. गेल्या वर्षी चिंचोक्याला १५०० रुपये असादर मिळत होता. यंदा चिंचोक्याला २०० रुपयांची वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com