Agriculture news in marathi Tambera on sugarcane due to cloudy weather | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे उसावर तांबेरा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

ऊस पिकावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीने ऊस एकशेवडी आणि विरळ आहेत आणि अशातच तांबेराचे आक्रमण झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊसउत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनगर, जि. पुणे ः अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीने ऊस एकशेवडी आणि विरळ आहेत आणि अशातच तांबेराचे आक्रमण झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊसउत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस विशेषज्ञांनी हा रोग धोकादायक असून सामूहिक बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

   चौधरवाडीचे ऊस उत्पादक संपतराव पवार म्हणाले, "फुले २६५ या वाणावर तांबेराचा प्रादुर्भाव आहे. मात्र को ८६०३२ या वाणावर फारसा आढळत नाही. लोकरी मावा मात्र सर्व उसावर दिसू लागला आहे.'' वडगाव निंबाळकरचे ऊसउत्पादक संतोष दरेकर यांनी सांगितले की, तुटून जाणाऱ्या उसावर आणि नव्या ऊस लागवडीवरही प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीनाशकाची फवारणी केली तरी हटत नाही. आधीच पाऊस, ढगाळ हवामानाने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यात तांबेराने आणखीनच धास्ती लावली आहे.
 

प्रतिक्रिया

तांबेराची लागण झाल्यामुळे प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया ठप्प होते. परिणामी साखर तयार करण्याचे कार्य मंदावते आणि ऊस उत्पादनात घट येते. त्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिलिटर किंवा टेबुकोन्याझोल १ मिली प्रतिलिटर प्रमाणात पाण्यामध्ये मिसळावे. दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. हा संसर्गजन्य रोग असल्याने सामूहिक पद्धतीने बंदोबस्त करणे आवश्‍यक आहे.  
- डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ज्ञ, पाडेगाव संशोधन केंद्र 

तांबेरा तर आहेच शिवाय बॉऊन स्पॉट (तपकिरी गोल ठिपका) ही दिसून येत आहे. तर काही ठिकाणी लोकरी माव्याचाही प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उसाला फुटवे कमी येतात. वाढ मंदावते. दहा ते चाळीस टक्केपर्यंत उत्पादनात घट होऊ शकते. 
- विराज निंबाळकर, ऊस विकास अधिकारी, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

असा होतो परिणाम 

  •  तांबेरा बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होत आहे 
  •  आधी पानावर लहान व लांबट पिवळे ठिपके पडत आहेत 
  •  त्या ठिपक्‍यांची लांबी वाढून ते लालसर तपकिरी बनत आहेत 
  •  तो ठिपका फुगतो, त्यातून बुरशीचे जिवाणू बाहेर पडून हवेद्वारे जात आहेत 
  •  आधी पाने पिवळी पडत आहेत 
  •  रोगाची तीव्रता वाढत गेल्यावर करपून वाळत आहेत 
  •  जुलै, ऑगस्टमध्ये केलेल्या नव्या ऊसलागवडींना अक्षरशः घेरले आहे
     

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी...