जळगाव : 'जलयुक्त'च्या ४० गावांमध्येही टॅंकर

जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील ४० गावांमध्येही टॅंकर
जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील ४० गावांमध्येही टॅंकर

जळगाव ः जिल्ह्यात जेथे मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली, त्यातील ४० गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. संबंधित गावांमध्ये पाऊस अत्यल्प झाल्याने टॅंकरशिवाय पर्याय नसल्याची माहिती मिळाली. यातच जिल्ह्यात १९३ गावांना १७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.   जिल्ह्यात मागील वित्तीय वर्षात सुमारे २०२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेण्यात आली. त्यातील अनेक गावांमध्ये पाऊसमान अल्प होते. अमळनेर, पारोळा, जामनेर, चाळीसगाव या तालुक्‍यांमध्ये जेथे जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेतली, तेथेही दुष्काळी स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित ४० गावांमध्ये टॅंकर सुरू करावे लागले आहे. तसेच यावल, रावेर, चोपडा हे तीन तालुके वगळता बारा तालुक्‍यांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी २७१ गावांमध्ये २७८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ५४ गावांमध्ये ५१ ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. ६१ गावांमध्ये १११ ठिकाणी विंधन विहिरी झाल्या आहेत. ४२ गावांमध्ये ५८ ठिकाणी नवीन कूपनलिका, तर ४८ गावांमध्ये विहिरी खोलीकरणाची कामे सुरू आहेत.  चौथ्या टप्प्यात तीन हजार कामे सुरू, मोठा खर्च जलयुक्त शिवार योजनेचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. चौथ्या टप्प्यात २३५ गावांत कामे सुरू करण्यात येत असून, यासाठी १३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्याचे कामही आता कृषी विभागांतर्गत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे चौथ्या टप्पा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्‍यांत २३५ गावांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये कामे सुरू करण्यात आली असून, यासाठी जिल्हास्तरीय समितीद्वारे ४ हजार ४२६ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात ३ हजार ११४ कामे सुरू करण्यात आली आहेत. तर १ हजार १७९ कामे पूर्ण झालेली आहेत. १ हजार १३५ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी आतापर्यंत एकूण १४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.  टॅंकरग्रस्त गावांची माहिती

तालुका गावे संख्या 
जळगाव
जामनेर ३२ ३४
धरणगाव
एरंडोल
भुसावळ
मुक्ताईनगर
बोदवड
पाचोरा १६ १८
चाळीसगाव ३८ ३९
भडगाव
अमळनेर ५० ३४
पारोळा ३४ २४
एकूण  १९३ १७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com