agriculture news in Marathi, Tanker in 40 villages of Jalaukata Shivar campaign in Jalgaon district | Agrowon

जळगाव : 'जलयुक्त'च्या ४० गावांमध्येही टॅंकर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

जळगाव ः जिल्ह्यात जेथे मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली, त्यातील ४० गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. संबंधित गावांमध्ये पाऊस अत्यल्प झाल्याने टॅंकरशिवाय पर्याय नसल्याची माहिती मिळाली. यातच जिल्ह्यात १९३ गावांना १७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जळगाव ः जिल्ह्यात जेथे मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली, त्यातील ४० गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. संबंधित गावांमध्ये पाऊस अत्यल्प झाल्याने टॅंकरशिवाय पर्याय नसल्याची माहिती मिळाली. यातच जिल्ह्यात १९३ गावांना १७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

  जिल्ह्यात मागील वित्तीय वर्षात सुमारे २०२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेण्यात आली. त्यातील अनेक गावांमध्ये पाऊसमान अल्प होते. अमळनेर, पारोळा, जामनेर, चाळीसगाव या तालुक्‍यांमध्ये जेथे जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेतली, तेथेही दुष्काळी स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित ४० गावांमध्ये टॅंकर सुरू करावे लागले आहे. तसेच यावल, रावेर, चोपडा हे तीन तालुके वगळता बारा तालुक्‍यांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी २७१ गावांमध्ये २७८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ५४ गावांमध्ये ५१ ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. ६१ गावांमध्ये १११ ठिकाणी विंधन विहिरी झाल्या आहेत. ४२ गावांमध्ये ५८ ठिकाणी नवीन कूपनलिका, तर ४८ गावांमध्ये विहिरी खोलीकरणाची कामे सुरू आहेत. 

चौथ्या टप्प्यात तीन हजार कामे सुरू, मोठा खर्च
जलयुक्त शिवार योजनेचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. चौथ्या टप्प्यात २३५ गावांत कामे सुरू करण्यात येत असून, यासाठी १३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्याचे कामही आता कृषी विभागांतर्गत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे चौथ्या टप्पा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्‍यांत २३५ गावांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये कामे सुरू करण्यात आली असून, यासाठी जिल्हास्तरीय समितीद्वारे ४ हजार ४२६ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात ३ हजार ११४ कामे सुरू करण्यात आली आहेत. तर १ हजार १७९ कामे पूर्ण झालेली आहेत. १ हजार १३५ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी आतापर्यंत एकूण १४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

टॅंकरग्रस्त गावांची माहिती

तालुका गावे संख्या 
जळगाव
जामनेर ३२ ३४
धरणगाव
एरंडोल
भुसावळ
मुक्ताईनगर
बोदवड
पाचोरा १६ १८
चाळीसगाव ३८ ३९
भडगाव
अमळनेर ५० ३४
पारोळा ३४ २४
एकूण  १९३ १७५

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...