agriculture news in marathi, Tanker crosses hundreds of thousands | Agrowon

खानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

जळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. टॅंकरची संख्या शंभरीपार पोचली आहे. ही संख्या आणखी १० ते १२ ने वाढू शकते. टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, भूगर्भात पाणीच नसल्याने प्रशासनासमोरही अडचणी आहेत. सर्वाधिक गंभीर समस्या नंदुरबार, शिंदखेडा (जि. धुळे) या तालुक्‍यांमध्ये आहे. 

जळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. टॅंकरची संख्या शंभरीपार पोचली आहे. ही संख्या आणखी १० ते १२ ने वाढू शकते. टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, भूगर्भात पाणीच नसल्याने प्रशासनासमोरही अडचणी आहेत. सर्वाधिक गंभीर समस्या नंदुरबार, शिंदखेडा (जि. धुळे) या तालुक्‍यांमध्ये आहे. 

नंदुरबार तालुक्‍यात सुमारे ४० गावांमध्ये टंचाईस्थिती बिकट आहे. शहादा, नवापुरातही काही गावांमध्ये जलसंकट आहे. जिल्ह्यात सुमारे ४० टॅंकर सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री व धुळे तालुक्‍यांत संकट वाढत आहे. पांझरा व इतर नदीकाठच्या गावांमध्येही टंचाई वाढली आहे. तापी नदीकाठी स्थिती बरी आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ टॅंकर सुरू आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५ टॅंकर सुरू आहेत. पाण्याचे स्राेत तात्पुुरते उपाय करूनही मिळत नसल्याने पाणीटॅंकरनेच पाठविण्याची वेळ आली आहे. टॅंकरचे पाणी ग्रामस्थ धुणी-भांड्यासाठी वापरतात. पण, पिण्याच्या पाण्यासाठी नजीकच्या खासगी जलशुद्धीकरण यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. रोज २० ते ३० रुपयांचे पिण्याचे पाणी काही गावांमध्ये एका घरातील सदस्यांना घ्यावे लागत आहे. कासोदा (ता. एरंडोल, जि. जळगाव), नशिराबाद (जि. जळगाव), आसोदा (जि. जळगाव), कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ग्रामस्थांना टॅंकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. 

गिरणाकाठच्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहेत. गिरणा नदीत टंचाई निवारणार्थ पाणी सोडले आहे. परंतु, ते सोमवारपर्यंत (ता. २५) नदीच्या शेवटच्या भागात पोचले नव्हते. या आवर्तनामुळे गिरणाकाठच्या ४० ते ५० गावांमध्ये महिनाभर पाण्याची समस्या कमी राहील, अशी स्थिती आहे. 

मिरची पिकाला फटका
नंदुरबार तालुक्‍यातील कोळदे, लहान शहादे, पळाशी, धमडाई, पथराई, नाशिंदे, खोंडामळी, तिसी, चौपाळे, कोठली आदी ३१ गावांमध्ये मिरची पिकालाही पाणीटंचाईचा फटका बसला आहे.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...