यंदा पाच वर्षांतील तीव्र पाणीटंचाई

टॅंकर
टॅंकर

पुणे : राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने टंचाइच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक टंचाई असल्याचे दिसून येत आहे. सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर २०१६ मध्ये राज्यात तीव्र दुष्काळ जाणावला होता. त्यापेक्षाही यंदा पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यातील २ हजार १५१ गावे आणि ४ हजार ८५० वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी २ हजार ६३६ टॅंकर सुरू असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणी टंचाई असून, नाशिक, पुणे टंचाईच्या झळा वाढत आहेत.  २०१४ आणि २०१५ मध्ये पावसाने ओढ दिल्याने २०१६ च्या उन्हाळ्यात राज्यात पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले होते. मार्च २०१६ मध्ये राज्यात १ हजार ९५३ गावे २ हजार ६५२ वाड्यांमधील टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ५४९ टॅंकर सुरू होते. यावर्षी टंचाई तीव्रता अधिक असल्याने २०१६ च्या तुलनेत मार्च महिन्यातच आणखी १९८ गावे, २ हजार १९८ वाड्यांमध्ये ८६ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. गतवर्षी याच काळात केवळ टंचाईग्रस्त ३०४ गावे ९ वाड्यांसाठीसाठी २९४ टॅंकरने पाणी द्यावे लागत होते. पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी जायचा असून, वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाई आणखी गंभीर होणार आहे.  अौरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टंचाई भासत आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील ११७६ गावे ३७६ वाड्यांमध्ये १ हजार ५३९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ५४५ गावे २०३ वाड्यांसाठी ७५६ टॅंकर सुरू आहेत. नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव या चार जिल्ह्यांत ५९४ गावे, २ हजार ३८२ वाड्यांना ६८१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक ३७८ गावे व १ हजार ९४२ वाड्या टंचाईने बाधित झाल्या आहेत. पुणे विभागातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापुरात टंचाई वाढली असून, २८० गावे २ हजार ५९ वाड्यांमध्ये ३०५ टॅंकरने, अमरावती विभागातील बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ८५ गावांना ९० टॅंकरने, तर कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यांतील १६ गावे ३३ वाड्यांना २१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com