संगमनेर : प्रांताधिकाऱ्यांकडून टॅंकरची पाहणी

टॅंकरबाबतच्या ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य आढळले. जीवनावश्‍यक असलेल्या पाण्याच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा होणे योग्य नाही. गळके व सुस्थितीत नसलेले टॅंकर आढळून आले. फेऱ्याही कमी झाल्या आहेत. प्रशासनातील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी
प्रांताधिकाऱ्यांकडून टॅंकरची पाहणी
प्रांताधिकाऱ्यांकडून टॅंकरची पाहणी

संगमनेर : प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दोन दिवसांपूर्वी तालुक्‍याच्या पठार भागात केलेल्या तपासणीत प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला. तालुक्‍यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. ११) जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत विविध अधिकाऱ्यांची 'हजेरी' घेतली. 

टॅंकरसंदर्भातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे स्थानिक अधिकाऱ्यांना देता न आल्याने याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात टॅंकरच्या खेपांमधील अनियमितता, जीपीएस प्रणालीचा न होणारा वापर, यांसारख्या असंख्य तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. प्रसारमाध्यमांतून त्यांची चर्चा झाल्याने, याबाबत खात्री करून घेण्यासाठी डॉ. मंगरुळे यांनी सोमवारी (ता. १३) पठार भागाचा दौरा केला. मंडलाधिकारी किसन लोहरे त्यांच्या सोबत होते. 

पठार भागातील वनकुटे, भोजदरी येथील ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. टॅंकरच्या मंजूर खेपा, कागदोपत्री दाखविल्या जाणाऱ्या खेपांची चौकशी केली. तपासणीत टॅंकरच्या खेपांमध्ये अनियमितता आढळली. याशिवाय टॅंकरच्या मोठ्या प्रमाणातील गळतीमुळे पूर्ण पाणीदेखील मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. टॅंकर सुस्थितीत नसल्याचे व काही ठिकाणी लॉगबुकदेखील नसल्याची माहिती समजल्याने, त्यांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याचा निश्‍चय केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com