agriculture news in marathi Tanker start in northeastern part of Nashik | Page 3 ||| Agrowon

नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत.

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालु वर्षी एप्रिलच्या सुरवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्तरपूर्व भागात देवळा, चांदवड व येवला तालुक्यातील ३५ गावे व वाडी-वस्त्यांवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १५ टँकर सुरू करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील पश्चिम भागात पर्जन्यमान अधिक असले तरी पाऊस कमी आहे. त्यामुळे या भागात एक मीटरपर्यंत भूजल पातळीत घट आहे. मात्र अद्याप या भागात टँकर सुरू नाहीत. उत्तरपूर्व भागात चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. मात्र उपसा वाढल्याने अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे देवळा, चांदवड व येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. 

येवला तालुक्यातील पूर्व भागात डिसेंबरनंतर पाणी उपसा वाढला. त्यामुळे विहिरी खोल जाण्यास सुरवात झाली आहे. समाधानकारक पाऊस होऊनही आता उशिरा टंचाई भासत आहे. मात्र काही भागात पाणीटंचाई वाढत असल्याने पुन्हा एकदा टँकर फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. 

येवल्यात पाणीप्रश्न गंभीर 

जिल्ह्यात सर्वाधिक १३ टँकर येवला तालुक्यात ३१ ठिकाणी सुरू झाले आहेत. ज्यामध्ये ममदापूर, खरवंडी, देवदरी, तळवाडे, आहेरवाडी, गोरखनगर, कोळगाव, वाई बोथी, आडसुरेगाव, रेंडाळे, कोळम, वसंतनगर, भुलेगाव, अंकाई, नगरसुल, कासारखेडे, देवठाण, खामगाव, चांदगाव, पन्हाळसाठे, भायखेडा, पिंपळखुंटे या गावांसह इतर वाडी-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. तर अजूनही हे संकट वाढण्याची शक्यता आहे. 

गेल्या दीड महिन्यांपूर्वी पाण्याची टंचाई तीव्र झाली. त्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांना पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी अडचण होती. त्यासाठी टँकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविला होता. आता टँकर सुरू झाले आहेत. यावर्षी  
लवकर संकट आले आहे.
- गोकूळ सानप, सामाजिक कार्यकर्ते, कोळगाव, ता. येवला. 

सध्या जिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे दाहकता वाढली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी टँकर मंजूर झाल्याने दिलासा मिळाला. मात्र पाणी टंचाई वाढत असल्याने विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. मात्र त्यातील पाणी संपत आहे. 
- प्रवीण गायकवाड, सभापती-पंचायत समिती, येवला. 

टँकर स्थिती अशी

तालुके गावे  वाड्या सुरू टँकर लोकसंख्या
देवळा ४,३३९
चांदवड १  १   २,९९३
येवला २०   ११ १३ ३०,९७४
एकूण २४  ११ १५ ३८,३०६

 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...