माणमध्ये दुचाकीला जीपीएस लावून टॅंकरच्या बोगस खेपा 

माणमध्ये दुचाकीला जीपीएस लावून टॅंकरच्या बोगस खेपा 
माणमध्ये दुचाकीला जीपीएस लावून टॅंकरच्या बोगस खेपा 

सातारा : दुष्काळी माण तालुक्‍यात टॅंकरच्या खेपा झाल्याचे दाखविण्यासाठी टॅंकरची जीपीएस प्रणाली काढून दुचाकीला लावून, ती संबंधित गावांत फिरविली जात आहे. भालवडी (ता. माण) येथे आठ खेपा असताना केवळ तीन खेपा टाकल्या जात आहेत, असे आरोप माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे यांनी केला. यामुळे जिल्हा परिषद सभागृहात खळबळ उडाली. 

दरम्यान, त्याची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. 

अध्यक्ष श्री. नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १८) सर्वसाधारण सभा झाली. माणमध्ये माणसांना व पशुधनाला कमी प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत आहे. जवळचे पाणी भरण्याचे ठिकाण सोडून खेपा लांबून केल्या जात आहेत. काही चालक टॅंकरची जीपीएस काढून दुचाकींना लावून तिच संबंधित गावांतून फिरवून आणत आहेत,’ असे आरोप श्री. गोरे यांनी केले. 

त्यावर श्री. शिंदे यांनी त्या संबंधिचे पुरावे द्या, असे सांगितल्यानंतर श्री. गोरे यांनी सरपंचांच्या नावानिशी तक्रार देणार असल्याचे सांगितले. त्याच विषयावर श्री. पाटोळे यांनी माझ्या स्वत:च्या भालवडी गावाला आठ टॅंकरच्या खेपा मंजूर असताना केवळ तीनच टाकल्या जात आहेत, असे सांगून तरीही ग्रामसेवक, शिपाई सह्या करत आहेत, असा गौप्यस्फोट केला. ‘सभापतींच्या गावातच असे होत असेल तर कसे चालेल,’ अशी स्पष्टोक्‍ती श्री. गोरे यांनी जोडली. त्यावर संजीवराजे, श्री. शिंदे यांनी या आरोपांची खातरजमा करून दोन दिवसांत संबंधित ग्रामसेवक, शिपायावर फौजदारीची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com