agriculture news in marathi, Tanker's proposal has been lost due to election | Agrowon

जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव खोळंबले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. टॅंकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे वाढत आहेत. टॅंकरची संख्या जळगाव जिल्ह्यात १३२ वर पोचली आहे. धुळे व नंदुरबारात मिळून ११० पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. टॅंकर मागणीचे अनेक प्रस्ताव निवडणुकीमुळे मंजुरीअभावी पडून आहेत. आचारसंहितेचा फटका पाणीटंचाईच्या उपाययोजनांना बसत असल्याचे सरपंच, ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  

जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. टॅंकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे वाढत आहेत. टॅंकरची संख्या जळगाव जिल्ह्यात १३२ वर पोचली आहे. धुळे व नंदुरबारात मिळून ११० पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. टॅंकर मागणीचे अनेक प्रस्ताव निवडणुकीमुळे मंजुरीअभावी पडून आहेत. आचारसंहितेचा फटका पाणीटंचाईच्या उपाययोजनांना बसत असल्याचे सरपंच, ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  

जळगाव जिल्ह्यात टंचाई वाढल्याने टॅंकरसाठी अनेक प्रस्ताव दाखल झाले. त्याच्या मंजुरीसाठी ग्रामसेवक, तलाठ्यांचे सहकार्य मिळत नाही. कारण ही मंडळी निवडणुकीच्या कामात विविध भागात व्यस्त आहे. यातच मागील पंधरवड्यात जळगावात ४७ टॅंकर वाढले आहेत. चाळीसगाव तालुक्‍यात २९ व अमळनेरात २३ टॅंकर सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, चोपडामध्ये, तर नंदुरबारमधील तळोदामध्ये टॅंकर सुरू नसल्याची माहिती मिळाली. 

नंदुरबार तालुक्‍यात ४१ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. धुळ्यात साक्री, धुळे व शिंदखेड्यात मिळून ६० पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. तात्पुरत्या पाणी योजनांबाबतही प्रशासनाला यश येत नसल्याची स्थिती आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात अनेक गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले आहे. आवश्‍यकतेनुसार तात्पुरत्या पाणी योजनांबाबत कार्यवाही सुरू आहे. परंतु, टॅंकरची मागणी मात्र कायम असून, त्याच्या प्रस्तावांचे ढीग तहसील व इतर कार्यालयांमध्ये वाढत आहेत. 

जळगावात १४७ गावांत तीव्र टंचाई

जळगाव जिल्ह्यात १४७ गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील मिळून १५० गावांमध्ये टंचाई स्थिती गंभीर आहे. संबंधित गावांमध्ये विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने टॅंकर सुरू करावे लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात २४२ गावांसाठी २४७ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. ४६ गावांना ४३ ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. ५४ गावांना ९९ विहिरी मंजूर आहेत. ३८ गावांना ५२ नवीन कूपनलिका सुरू केल्या आहेत. ४५ गावांमध्ये विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत, असा दावा काही दिवसांपूर्वी प्रशासनाने केला होता.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...