जत तालुक्यात मागणी करूनही टँकर

जत तालुक्यात मागणी करूनही टँकर
जत तालुक्यात मागणी करूनही टँकर

सांगली ः जत तालुक्‍याच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता भीषण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मैलोन्‌ मैल वणवण सुरू आहे. पशुधनाचे तर पाणी आणि चाऱ्यासाठी प्रचंड हाल होत आहे. तालुक्‍यातील वीस गावांनी टॅंकरसाठी सप्टेंबरमध्येच प्रस्ताव पाठवले होते. त्यास मंजुरी मिळाली असूनदेखील प्रशासनाने टॅंकर सुरू केले नाहीत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.

जत तालुक्‍यात यंदा १४४.६ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पाऊस झाला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. तालुक्‍यात २६ तलाव आहेत. त्यापैकी १२ तलाव कोरडे पडले आहेत. तर सहा तलावातील पाणी संचय पातळीखाली आहे. तालुक्‍यातील पाणीटंचाई भासणाऱ्या गावात टॅंकर सुरू करण्याची मागणी सप्टेंबरमध्ये केली होती. त्यास मंजूरही दिली आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही टॅंकर सुरू केले नाहीत.

पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. ५२ गावे व त्याखालील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी हिवाळ्यातही दाही-दिशा वणवण करण्याची वेळ शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे. जिल्हा टॅंकरमुक्त केला आहे. टॅंकरमुक्तीच्या नावाखाली टॅंकर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे.जत तालुक्‍याच्या पूर्व भागातून अजून टॅंकर मागणी होऊ लागली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी पेरणी केली होती. पाणी नसल्याने वाळू लागली आहे. टॅंकरची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही टॅंकर सुरू केले नाहीत. त्यामुळे पिण्याचे पाणी कोठून आणायचा असा प्रश्‍न पडला आहे. त्यातच शेतीला पाणी नाही. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. - बाळासाहेब सोलंकर, माडग्याळ, ता. जत, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com