agriculture news in marathi, tantamukta village scheme status, chandrapur, maharashtra | Agrowon

तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात उतरती कळा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियानाला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये गेल्या काही वर्षांत नवीन तंटामुक्‍त मोहिमेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. परिणामी जुनेच अध्यक्ष कामकाज पाहत आहेत. 

चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियानाला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये गेल्या काही वर्षांत नवीन तंटामुक्‍त मोहिमेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. परिणामी जुनेच अध्यक्ष कामकाज पाहत आहेत. 

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच मिटावेत व सलोखा वाढीस लागावा या हेतूने महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव योजना मांडली होती. आघाडी सरकारच्या काळात अत्यंत प्रभावी ठरलेल्या या योजनेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक बदल गावपातळीवर नोंदविण्यात आले. अनेक गावांनी या योजनेच्या बळावर गावातील तंटे गावातच मिटवित पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढली नाही, अशा गावांना प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांना पुरस्कार देत गौरविण्यात आले. त्यातूनच स्पर्धा वाढीस लागत अनेक गावे तंटामुक्‍तीच्या श्रेणीत आली. पोलिसांवरचा ताणदेखील यामुळे कमी होण्यास मदत झाली होती. अशा प्रकारे अनेक फायदे तंटामुक्‍त गाव मोहिमेचे असताना युती सरकारच्या काळात या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी ३० सप्टेंबरनंतर मोहिमेच्या काळात तंटे निकाली काढले जातात.

सद्यःस्थितीत योजनाच दुर्लक्षित असल्याने या मोहिमेचा अध्यक्ष व्हायलादेखील कोणीच तयार नाही. मानधन नाही, स्टेशनरी नाही, त्यामुळेदेखील हे घडत असल्याची चर्चा आहे. परिणामी ४१८ ग्रामपंचायतींमध्ये अध्यक्ष आणि समिती सदस्य जुनेच आहेत. वर्ष बदलल्यावर शासन निर्णयाप्रमाणे नवीन अध्यक्ष ग्रामसभेतून निवडणे आवश्‍यक असते. या मोहिमेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गावपातळीवरील तंटे आता थेट पोलिस ठाण्यात पोचत असल्याने पोलिसांवरचा ताणदेखील वाढत आहे. 

४१८ ग्रामपंचायतींत जुनेच अध्यक्ष
जिल्ह्यात ८२८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४१८ गावांमध्ये जुनेच अध्यक्ष आहेत. नव्या अध्यक्षांची निवड गेल्या काही वर्षांत झालेली नाही. त्यातही भरीस भर म्हणजे ४१० ग्रामपंचायतींमध्ये तंटामुक्‍त मोहिमेचा अध्यक्षच नाही.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...