Agriculture news in marathi, Tapi, Waghur, Girna rivers flooded again | Agrowon

तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

जळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तापी, गिरणा, वाघूर नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. नद्यांच्या उगमक्षेत्रात पाऊस झाल्याने हा पूर आला. 

जळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तापी, गिरणा, वाघूर नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. नद्यांच्या उगमक्षेत्रात पाऊस झाल्याने हा पूर आला. 

वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग मंगळवारी (ता.२१) सुरू झाला. यामुळे नदीला पूर आला. तापी नदीच्या उगमक्षेत्रातही पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. 

गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झालेला नसला तरी गिरणा नदीत मन्याड, जामदा बंधाऱ्यातून पाणी येत आहे. नदीचे लाभक्षेत्र असलेल्या भडगाव, पाचोरा, चाळीसगावच्या अनेक भागांत गेल्या तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला. यामुळे नदीला पुन्हा पूर आला आहे. या शिवाय इतर लहान नद्यांमध्ये देखील प्रवाही पाणी आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठण्याच्या स्थितीत आहे. धुळे व नंदुरबारातही पाऊस सरासरीपर्यंत पोहोचला आहे.

चाळीसगाव तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी बाराला सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत 
सुरूच होता. 

दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन काही वेळ अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. डोंगर पट्ट्यातही बराच वेळ पाऊस झाला. त्यामुळे काही वेळातच शहरातून वाहणाऱ्या नदीला पाणी वाढले होते. त्यामुळे ३१ ऑगस्टला झालेल्या पावसाची आज पुन्हा आठवण झाली.

दरम्यान, पावसाचा जोर वाढत राहिल्यास संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या रहिवाशांसह गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 
खानदेशातील धुळ्यात मालनगाव, सोनवद, पांझऱा, जळगावमधील बहुळा, मन्याड, बोरी, तोंडापूर, वाघूर, मंगरूळ, सुकी, अभोरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...