कोल्हापुरात शनिवारपासून ताराराणी महोत्सव

कोल्हापुरात शनिवारपासून ताराराणी महोत्सव
कोल्हापुरात शनिवारपासून ताराराणी महोत्सव

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वतीने ५ ते ९ जानेवारीअखेर ताराराणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे हे प्रदर्शन होणार आहे. विक्री प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणारे स्वयंसाह्यता बचत गट सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या स्वयंसाह्यता गटांची निवड करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरी चप्पल, गूळ, काकवी, कोल्हापुरी साज, व्हाइट मेटल ज्वेलरी, कापडी पिशव्या, बेदाणे, हळद, कंदी पेढे, सॉफट टॉइज, मातीची भांडी, स्ट्रॉबेरी, नॅपकीन, घोंगडी, विविध प्रकारची लोणची-पापड, लाकडी खेळणी इत्यादि विविध वस्तूंची विक्री तसेच शाकाहारी, मांसाहारी जेवण, कोल्हापुरी मिसळ, नाशिकचे प्रसिद्ध मांडे (पुरणपोळी) इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सांगली, सातारा, सोलापूर व सिंधुदुर्ग येथील समूह सहभागी होणार आहेत.  यामध्ये वस्तू व खाद्यपदार्थांच्या स्टॉलची उभारणी करण्यात येणार असून, वस्तूंचे ९८ व खाद्यपदार्थांचे ५० असे एकूण १४८ समूह सहभागी होतील. राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार सन २०१७-१८ साठी जिल्हास्तरीय पुढील पुरस्कार प्राप्त गटांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये कृष्णावेणी स्वयंसाह्यता समूह, दत्तवाड (ता. शिरोळ), श्री महालक्ष्मी स्वयंसाह्यता समूह, (मालवे, ता. राधानगरी)  ज्वालामालिनी स्वयंसाह्यता समूह, राशिवडे (ता. राधानगरी) यांचा समावेश आहे. या महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिक महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल, सुषमा देसाई, आदींनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com