कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यात
अकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असून या हानीची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक दाखल झाले आहे. शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात पथकाचे सदस्य असलेले केंद्रीय कापूस संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग येत आहेत.
अकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असून या हानीची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक दाखल झाले आहे. शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात पथकाचे सदस्य असलेले केंद्रीय कापूस संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सिंग हे अकोला व बाळापूर तालुक्यात काही गावांना भेट देणार आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राने पथक नेमले आहे. या पथकाचे सदस्य राज्याच्या वेगवेगळ्या महसूल विभागात दौऱ्यावर आहेत.डॉ. सिंग यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी ८.३० वाजता पाहणीला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सिंग व अधिकारी अकोला तालुक्यातील म्हैसपूर, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द येथे भेट देतील. तर बाळापूर तालुक्यात भरतपूर, नकाशी, वाडेगाव, कासारखेड येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
या दौऱ्यात कृषी, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर हे पथक दुपारी बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना होईल. जिल्ह्यात या ऑक्टोबरमधील पाऊस व अतिवृष्टीमुळे तीन लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. यासाठी नुकसान भरपाई म्हणून सुमारे २४८ कोटींची शासनाकडे मागणीसुद्धा जिल्हा प्रशासनाने केली आहे. राज्याच्या मदतीचा पहिला हप्ता नुकताच प्राप्त झालेला आहे. हा निधी तालुक्यांना वितरीतही करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मात्र याहीपेक्षा अधिक मदतीची अपेक्षा लागलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हयात दौरा करीत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन मागे राहणार नाही, असेही सांगितले होते. मात्र राज्यपालांनी हेक्टरी ८००० रुपये मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांची नाराजी झालेली आहे. नुकसान बघता हेक्टरी किमान २५ हजारांची मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी केलेली आहे. यामुळेच आता केंद्राचे पथक येत असल्याने याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पीकनिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोयाबीन | १७३४०५ |
कापूस | १५३०९५ |
तूर | १४६० |
ज्वारी | १०८३४ |
मका | २०.६ |
तीळ | १०६ |
इतर | २६१४३ |
- 1 of 586
- ››