हंगामही अंतिम टप्प्यात आणि वजनकाटा तपासणीसाठी भरारी पथके

cane chrushing
cane chrushing

सोलापूर: यंदा ऊस तुटवड्यामुळे आणि कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांपैकी अवघे १० कारखाने सुरू आहेत. आता त्यांचा हंगामही अंतिम टप्प्यात असताना, प्रशासनाला कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत जाग आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वजनकाट्यांची तपासणी करण्याकरिता संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकाची स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या उशिराच्या शहाणपणाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.  वजनकाट्याचा प्रश्न तसा शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी हंगामाच्या तोंडावर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच ही पथके नियुक्त करण्यात येतात. यंदा त्यात चालढकल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर हे गांभीर्य दाखवल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुढाकार घेत, थेट याचा आदेश जारी केला. त्यानुसार, वैधनमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक श्री. एस. के. बागल, सदस्य सचिव आहेत. साखर कारखाना हद्दीत असलेल्या पलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार, शेतकरी प्रतिनिधी, लेखापरीक्षक पी. आर. शिंदे,( पंढरपूर, सांगोला, माळशिरस) लेखापरीक्षक, एन. डी. माडे, (बाशी, माढा, करमाळा,मोहोळ) लेखापरीक्षक के. आर. धायफुले, (उ. सोलापूर, द. सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा) असे पथकाचे सदस्य आहेत.  भरारी पथकांनी कारखाना स्थळावर भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी, वजनाची पावती योग्यप्रकारे देण्यात येते किंवा कसे, याची खात्री करावी, वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच वजनकाट्याची तपासणी करावी. गैरप्रकार आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही शंभरकर यांनी सूचित केले आहे. पथकात शेतकऱ्यांचा समावेश करा साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणी संदर्भात भरारी पथकांमध्ये शेतकरी प्रतिनिधीचा समावेश तहसीलदार यांनी करावा. तहसीलदार यांनी भरारी पथकातील सदस्यांचे नाव व संपर्क क्रमांक साखर कारखाना व शेतकरी यांना उपलब्ध होईल, अशा प्रकारे प्रसिद्ध करावेत. भरारी पथकांनी केलेल्या कार्यवाहीबाबत दर पंधरवड्यास अहवाल सादर करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com