कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला 

येथील कृषी पंढरीत आजपासून (ता.१८) ‘कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताह’च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
technical week
technical week

माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता.१८) ‘कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताह’च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशिनरी पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्णत्वाला आल्याचे दिसून येते. 

अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्था-माळेगाव आणि बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना प्रवेश मोफत असणार आहे. यंदा कोरोनाची पार्श्‍वभूमी असली, तरी अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली आहे. शासनाच्या नियमानुसार संस्था प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टशिंग, मास्क, सॅनिटायजरचा उपयोग करणे सक्तीचे केले आहे. 

दरम्यान, शेती प्रत्याक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञापर्यंत अनेक गोष्टी उपस्थितांना पाहावयास मिळणार आहे. बारामतीमधील माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था व तेथील १४० एकर क्षेत्रावरील नवनवे शेती प्रयोग पाहण्याची संधी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना मिळणार आहे. अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्थेची स्थापना ११ वर्षांपूर्वी झालेली आहे. शेतीला वरदान ठरलेल्या या संस्थेची उभारणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून झाली आहे. संस्थेच्या विविध इमारती, प्रात्याक्षिक फार्मची उभारणी, प्रशस्त रस्ते, फुलझाडी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. 

माळेगाव येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून जिरायत शेती शाश्वश्‍वत कशी केली जाते, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हवामानातील बदलामुळे कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ शेतकऱ्यांना डोके वर करू देत नाही. त्या वातावरणात टिकून राहणारी पिके या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत.    विशेष अथिती...  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रेय भरणे, विश्‍वजित कदम, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी पदाधिकारी सोमवारी सकाळच्या सत्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला भेट देणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com