Agriculture news in Marathi Tehsildars are now rejecting the work of 'Shetkari Sanman' | Agrowon

‘शेतकरी सन्मान’च्या कामांना आता तहसीलदारांचाही नकारच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

येत्या ८ मार्चपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याला महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने १ मार्चला राज्याच्या मुख्य सचिवांना आपला विनम्र नकार कळविला आहे.

औरंगाबाद : येत्या ८ मार्चपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याला महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने १ मार्चला राज्याच्या मुख्य सचिवांना आपला विनम्र नकार कळविला आहे. त्यामुळे त्यापुढील काळात योजनेची अंमलबजावणी कोण करणार हा प्रश्‍न आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्याबद्दल नुकतेच राज्याच्या कृषी विभागाला केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांत किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी त्या राज्याच्या कृषी विभागाने केली आहे. परंतु राज्यात महसूल यंत्रणेकडे सोपविण्यात येते. महसूलकडे अनेक कामे आहेत. त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार योजनेचे काम महसूल विभागाकडून काढून मूळ विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रातील महत्त्वाच्या बाबी
योजनेच्या प्रारंभापासून अंमलबजावणीत महसूलचे मोठे काम
राज्यस्तर सोडून सर्व ऑनलाइन आयडी पासवर्ड महसूल अधिकाऱ्यांच्याच नावे अनवधानाने झालेल्या चुकीचा दोषही महसूल विभागाकडेच
कामकाज व्यवस्थित होत नसल्यास महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा

संघटनेच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंमलबजावणी विषयीचा मुद्दा राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचवीला आहे. तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरूनही याविषयी आधीच निवेदनाचा प्रपंच झाला आहे.
- किरण आंबेकर,
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...