agriculture news in marathi Telangana CM will agitate on Paddy repurchase issue by Central Government | Page 3 ||| Agrowon

तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्राच्या विरोधात करणार आंदोलन

वृत्तसेवा
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

भातपीकाच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात १२ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करणार असल्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात भूमिका घेणारे आणि प्रश्‍न विचारणाऱ्यांवर प्राप्तीकर खाते आणि ईडीचे छापे घातले जात असल्याबद्धल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टीका केली. वीज टंचाई आणि महागाईवरूनही केसीआर यांनी केंद्राला लक्ष्य केले. दरम्यान, भातपीकाच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात १२ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करणार असल्याचे राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

केंद्र सरकारने तेलंगण राज्यातील भाताची खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तेलंगण सरकारकडून केंद्राच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केंद्राला विविध मुद्यावरून आज घेरले. केंद्र सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस रद्द करत नाही, तोपर्यंत टीआरएसचे सरकार आणि नेते केंद्राविरोधात आंदोलन करत राहील, असे केसीआर म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्यांकडे आग्रह करून तेलंगणकडून भात खरेदी का केली जात नाही, याचा जाब विचारावा, असे आवाहनही केसीआर यांनी केले. केंद्राकडून भात खरेदीस नकार दिला जात असताना शेतकऱ्यांनी कापूस आणि अन्य पिकांकडे वळावे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. पीक खरेदीबाबत बियाणे कंपनीकडून हमी मिळाल्यास शेतकऱ्यांनी भाताची लागवड करावी, अशी सूचना त्यांनी केली. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये फसवणुकीचे राजकारण करून भाजप सत्तेवर आले आहे. केंद्राने सेस आणि कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि महागाई कमी करावी, अशी मागणी केली. केंद्र सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठराविक राज्यात भाववाढ कमी केली जात आहे. केंद्र ३ कोटी मेट्रिक टन उत्पादन करणाऱ्या राज्यातून भाताची खरेदी करणार का? असा सवाल केला.

बान्सवाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
शंकर नावाच्या शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज बान्सवाडा मंडळात हनमजीपेटा गावात उघडकीस आली. शंकर यांच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, शंकर यांच्यावर कर्ज होते. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी पंधरा लाखाचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी दोन एकर जमिनीची विक्री केल्याचे ते म्हणाले. कर्जफेड होत नसल्याचे पाहून त्यांनी आत्महत्या केली. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...