Agriculture news in Marathi Telecommunication equipment started in Malegaon; Offense on five owners | Agrowon

मालेगावात संचारबंदीत यंत्रमाग सुरू; पाच मालकांवर गुन्हा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

नाशिक : जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग सुरू असल्याने संबंधित यंत्रमाग मालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानिशा करण्यात आली आहे. याबाबत पाच यंत्रमाग मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

नाशिक : जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग सुरू असल्याने संबंधित यंत्रमाग मालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानिशा करण्यात आली आहे. याबाबत पाच यंत्रमाग मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आपले कार्यक्षेत्र नसतानाही त्या यंत्रमाग उद्योगात जाऊन तेथील मजुरांना मारहाण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.सद्यःस्थितीत मालेगाव येथील एकही यंत्रमाग उद्योग सुरू नसल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील काही यंत्रमाग सुरू आहेत, अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाली होती. लोकांनी असेही सांगितले की, यंत्रमाग बंद करण्याकरिता काही पोलिस तेथे आले होते. मात्र, त्या यंत्रमाग उद्योगावर कारवाई होण्याऐवजी संबंधित पोलिसांचीच बदली करण्यात आली, अशीही माहिती पसरविण्यात आली आहे. 

या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. ते पोलिस अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना दोन मजूर आढळले. त्यांनी त्या मजुरांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मालेगाव पोलिस उपअधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आपली क्षेत्र सोडून कामगारांना, मजुरांना मारहाण करण्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे. तसेच सध्या मालेगाव येथील कोणतेही यंत्रमाग सुरू नसून, पाच मालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

‘संचारबंदीचे उल्लंघन करू नये’
मालेगाव मध्ये पोलिस विभागाचे संचारबंदीत नियंत्रण असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल असे, श्री. मांढरे यांनी कळविले आहे. नागरिकांनीही आपल्या एखाद्या चुकीमुळे ‘कोरोना’चे रुग्ण वाढतील असे कोणतेही वर्तन करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आहे.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...