‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषात शहीद तौसीफ शेख यांना अंतिम निरोप

‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषात शहीद तौसीफ शेख यांना निरोप
‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषात शहीद तौसीफ शेख यांना निरोप

पाटोदा, जि. बीड : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसीफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसीफ आरिफ हे २०१० साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर भरती झाले होते. २६ एप्रिल २०११ मध्ये त्यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता. सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षांत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तौसीफ यांना पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कारदेखील करण्यात आला होता.

मात्र, बुधवारी (ता. १) जांबुरखेडा गावात नलक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ते हुतात्मा झाले. अंत्ययात्रेप्रसंगी हजारोंच्या संख्येने सहभागी नागरिकांनी ‘शहीद जवान तौसीफ शेख अमर रहे, नक्षलवाद मुरदाबाद’ अशा घोषणा दिल्या. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अंत्यसंस्कार (दफनविधी) प्रसंगी मुस्‍लिम बांधवांनी नमाज एं जनाजा अदा केली. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.

या वेळी मौलाना मुईम, हाफिज जाकेर, आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार साहेराव दरेकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, नगरध्यक्षा अनिता नारायणकर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. तौसीफ शेख यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com