‘टेंभू’ची थकीत पाणीपट्टी ३२ कोटी ९४ लाख रुपये

tembhu irrigation scheme water bill outstanding 33 crore
tembhu irrigation scheme water bill outstanding 33 crore

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे वीज बिल ३१ कोटी ६४ लाख, तर १ कोटी ६० लाख पाणीपट्टी अशी एकूण ३२ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. पाणीपट्टी जरी वसूल होत असली तरी, टेंभू योजनेकडून महावितरण कंपनीचे ३१ कोटी वीज बिल देणे लागत असल्याने थकीत वीज बिल दिल्याशिवाय वेळेत आवर्तन सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे वीज बिल देण्यासाठी पाटबंधारे विभागाने अद्यारपही कोणत्याही हालचाली सुरु केल्या नसल्याचे चित्र आहे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे महामंडाळाने २२ टीएमसी पाणी उचलण्यास मान्यता दिली आहे. दरवर्षी सुमारे ११ ते १५ टीएमसी पाणी उचलले जाते. सात तालुक्यातील २१० गावातील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रासाठी ही योजना आहे. यातून योजनेच्या सात तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. गेल्यावर्षी डिसेंबरपासून पाणी टंचाई निर्माण झाल्याने टेंभू योजना सुरु करुन दुष्काळीपट्ट्यातील गावांना पाणी दिले होते. त्यामुळे लाभक्षेत्रातील पाणी टंचाई कमी झाली होती. 

दरम्यान, या योजनेची पाणीपट्टी १ कोटी ६० लाख इतकी झाली आहे. वास्तविक पाहता, या योजनेच्या पाणी पट्टी जमा होण्यास साखर कारखाने पुढकार घेतात. कारखाना कार्यक्षेत्र सोडून पाणीपट्टी गोळा करण्याची तसदी पाटबंधारे विभाग घेत नाही. परंतू शंभर टक्के पाणीपट्टी वसूल होत नाही. सध्या पाणी टंचाई नाही. त्यामुळे योजना सुरु होणार नाही. परंतू काही दिवसानंतर शेतकऱ्यांकडून आवर्तन सुरु करण्याची मागणी होईल. त्यावेळी योजना सुरु करावी लागेल. मात्र, वीज बिलाची थकीत रक्कम अधिक असल्याने योजना सुरु करण्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. पाटबंधारे विभागाने वीज बिलापोटी थकलेली रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही महावितरण करण्याची शक्यता आहे.

महावितरणचे थकले ३१ कोटी  टेंभू उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करते. तर, साखर कारखान्यांकडून ऊस बिलातून पाणीपट्टीची कपात होऊन ती पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. मात्र, पाटबंधारे विभागाकडून वीज बिलापोटी असणारी रक्कम महावितरण कंपनीकडे वर्ग करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वीज बिलाची थकबाकीचा आकडा वाढत आहे. मात्र, वीज बिलाची थकीत रक्कम अधिक असल्याने योजना सुरु करण्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com