टेमघर धरणाची गळती ९०टक्के घटली; पुण्यावरील संकट टळले

टेमघर धरणाची गळती ९०टक्के घटली; पुण्यावरील संकट टळले
टेमघर धरणाची गळती ९०टक्के घटली; पुण्यावरील संकट टळले

खडकवासला, जि. पुणे : टेमघर धरणाची गळती असल्याने यंदा चार वर्षांनंतर पहिल्यांदा १०० टक्के भरले. प्रतिसेकंद २१४७.७३ लिटर एवढी असणारी गळती २५० लीटर प्रति सेकंद एवढी म्हणजे ९० टक्क्यापर्यंत कमी झाली आहे.

मागील वर्षी २० जुलैला ६८ टक्के पाणीसाठा असताना प्रतिसेकंद २०८ लिटर गळती होती. १६ जुलै २०१९ ला धरणात एक टीएमसी पाणीसाठा असताना प्रतिसेकंद २००लिटरची गळती होती. तर आज १००टक्के भरल्यावर गळतीचे प्रमाण २५० लीटर प्रति सेकंद एवढे आहे. तर ९०टक्के गळती थांबल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी केला.

सध्या होणारी गळती गॅलरीमध्ये आहे. धरणाचा निम्न बाजूची गळती आटोक्यात आली आहे. येत्या वर्षी शॉटक्रीटचे काम पूर्ण झाल्यावर गॅलरी मधील गळती देखील आटोक्यात येणार आहे.

उर्वरित दुरुस्ती करण्यासाठी जानेवारीपर्यंत टेमघर धरण पूर्ण रिकामे करून त्यानंतर उर्वरित दुरुस्ती केली जाणार आहे. असे भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे यांनी सांगितले.

एक टीएमसी जादा साठणार दरम्यान, गळती असल्याने मागील चार वर्षांपासून एक टीएमसी पाणी कमी साठविले जात होते धरण १०० टक्के भरणार असल्याने शहरात पिण्यासाठी किंवा जिल्हातील शेतीसाठी एक टीएमसी जादा पाणी मिळणार आहे.

गळती आणि दुरुस्ती धरणाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणातून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत, गळती रोखणे व दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त सचिव रानडे यांची नियुक्ती केली होती. त्याच्या अहवालानुसार काम सुरू आहे. तसेच दुरुस्तीच्या कामाच्या बाबतीत दुरुस्तीच्या कामात केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या (CWPRS) मार्गदर्शनानुसार दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गळतीचे गांभीर्य घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने पावले उचलून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम २०१७मध्ये हाती घेतले.

कारवाई आणि दुरुस्तीला निधी दरम्यान, पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणाऱ्या तीन कंपन्यांसह २२ अभियंत्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धरण मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि गळती रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत १०० कोटींची विशेष तरतूद केली. त्यानुसार २०१६ ते आज अखेर ८० कोटी रुपयांच्या तरतुदीमधून ९० टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. आता उर्वरित १० टक्के गळती रोखण्‍याच्‍या कामास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com