अकोल्यात तापमान ४१ अंशांवर पोहोचले

मागील दोन दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४१ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
The temperature in Akola reached 41 degrees
The temperature in Akola reached 41 degrees

अकोला ः यंदा जोरदार पावसानंतर आता उष्णतेचाही पारा जोराने वाढू लागला आहे. या वर्षी होळीच्या आधीच उन्हाच्या झळा बसू लागल्या. मागील दोन दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४१ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट राज्याच्या दिशेने येत असल्याचे यामागे कारण दिले जात आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या भागांत सोमवारपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) २१ मार्चपर्यंत उष्णतेच्या सरासरीपेक्षा अचानक तापमान वाढ होऊन उष्णतेच्या लाट सौम्य लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सियस राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.  अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. दिवसभर तप्त वातावरणामुळे दुपारच्या काळात पिके कोमेजलेली दिसून येतात. या लाटेपासून सुटका मिळण्यासाठी थंडपेये, फळांची मागणी वाढली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com