agriculture news in Marathi temperature below 10 Celsius Maharashtra | Agrowon

धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. खानदेशात थंडीच्या हंगामात पहिल्यादाच पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. रविवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. खानदेशात थंडीच्या हंगामात पहिल्यादाच पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. रविवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातही थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा झपाट्याने कमी झाला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम राजस्थान तसेच कर्नाटकाचा दक्षिण भाग व विदर्भात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यत घट झाली आहे. राजस्थानातील सिकर येथे सर्वात कमी ५.५ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. या भागातून थंड वारे काही प्रमाणात खानदेशाच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे खानदेशातील काही भागात किमान तापमानात घट झाली असून, थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली आहे.  

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामान कोरडे झाल्याने विदर्भातही थंडीने हळूहळू हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अकोला, बुलडाणा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. नागपूरमध्ये ११.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. तर गोंदिया, चंद्रपूर, बुलडाणा येथेही किमान तापमान १३ अंशांच्या दरम्यान होते.

मराठवाड्यातही किंचित थंडी असून बीड, औरंगाबाद, नांदेड येथे किमान तापमान १३ ते १५ अंशांच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक प्रमाणात असून, किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअस, कोकणातही २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  

रविवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः
नगर १४.०, अकोला १२.१ (-२), अलिबाग २१.२ (२), अमरावती १४.४ (-१), औरंगाबाद १३.१ (१), बीड १५.६ (३), बुलडाणा १३.०(-२), चंद्रपूर १३.८ (१), डहाणू २०.७ (२), गोंदिया १२.० (-१), जळगाव १३.६ (२), धुळे ९.४, कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्वर १४.४ (१), मालेगाव १४.० (३), मुंबई २२.२ (१), नागपूर ११.८ (-१), नांदेड १४.५ (२), नाशिक १४.० (२), निफाड १३.२, परभणी १३.०, लोहगाव १६.४ (३), पुणे १४.४ (३), रत्नागिरी २१.५ (१), सांगली १७.७ (३),
 सातारा १६.४ (३), सोलापूर १८.५ (३), ठाणे २३.४,  वर्धा १३.४ (-१).


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...