agriculture news in Marathi temperature continue down Maharashtra | Agrowon

किमान तापमानात होतेय घट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता असून, लवकरच गुलाबी थंडी परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता असून, लवकरच गुलाबी थंडी परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

उत्तरेकडून वाहणारे प्रवाह खंडित झाल्याने, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्प युक्त वाऱ्यांमुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. परिणामी, राज्यातील थंडीचा कडाकाही कमी झाला. मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. १७) निफाड येथे तापमान २.४ अंशांपर्यंत घसरले होते. यात दहा अंशांची वाढ होत शुक्रवारी (ता. २४) तापमान १२.६ अंशांवर पोचले आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान पुन्हा १५ अंशांच्या खाली आले आहे. तर मराठवाडा, विदर्भात तापमानात पुन्हा घट होण्यास सुरुवात झाली आहे. 

शुक्रवारी (ता. २४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.६ (२), नगर १५.५ (४), धुळे १०.०, जळगाव १३.६(१), कोल्हापूर १७.७(२), महाबळेश्वर १५.४(२), मालेगाव १४.६ (४), नाशिक १४.९ (५), निफाड १२.६, सांगली १६.६ (२), सातारा १४.६ (२), सोलापूर १८.८ (२), अलिबाग १९.८ (३), डहाणू १९.४ (२), सांताक्रूझ १९.८ (३), रत्नागिरी २०.२ (२).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...