मराठवाडा, विदर्भात पारा घसरला

उत्तरेतीललाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे राज्यातही काही प्रमाणात कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे
मराठवाडा, विदर्भात पारा घसरला
मराठवाडा, विदर्भात पारा घसरला

पुणे :  गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील जम्मू- काश्मीर आणि लडाख परिसरांत हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आली आहे. या लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे राज्यातही काही प्रमाणात कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या राज्यात हवामान कोरडे हवामान आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घरसला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी वाढली आहे. रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे ७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पहाटे चांगलीच थंडी वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. राज्यात दिवसभर ऊन पडत असले, तरी ते ऊन उबदार वाटत आहे. सायंकाळनंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच थंडी वाढत आहे. थंडीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर या भागांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  मराठवाड्यातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेच दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात ७ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या भागात किमान तापमान १२ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले. कोकणात बऱ्यापैकी थंडी वाढली आहे. यामुळे या भागात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातही तापमानात घट रविवारी (ता. २०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २०.२ (२), ठाणे २१, रत्नागिरी २२.४ (३), डहाणू २०.४ (२), पुणे १२.२ (१), जळगाव १२, कोल्हापूर १७.१ (२), महाबळेश्‍वर १२.१ (-१),  मालेगाव १३.२ (२), नाशिक १२.२ (२), निफाड १२, सांगली १६.५ (३), सातारा १४.८ (२), सोलापूर १५.५, औरंगाबाद १२.४ (१), बीड १८.३ (५), परभणी १०.६ (-२), परभणी कृषी विद्यापीठ ७, नांदेड १३.५ (१), उस्मानाबाद १४.४ (१), अकोला १२.६, अमरावती १२.७ (-२), बुलडाणा १३.८, चंद्रपूर १२.६, गोंदिया ७.४ (-५), नागपूर ८.६ (४), वर्धा १०.२ (-३), यवतमाळ १०.५ (-४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com