Agriculture news in Marathi The temperature difference increased | Page 2 ||| Agrowon

तापमानातील तफावत वाढली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे.

पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी मुख्यत: हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला 
आहे. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट सुरूच असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १७ अंशांच्या खाली घसरला आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.७ (१६.२), नगर ३३.८ (-), जळगाव ३३.५ (१५.७), कोल्हापूर ३३.१ (२२.०), महाबळेश्वर २७.५ (१४.८), मालेगाव ३०.० (१६.६), 
नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.९(२१.०), सातारा ३२.९(१७.७), सोलापूर ३५.२ (१८.१), सांताक्रूझ ३४.४ (२२.९), डहाणू ३२.३ (२२.८), रत्नागिरी ३६.७ (२३.०), औरंगाबाद ३१.३ (१६.०), नांदेड ३३.४(१९.०), उस्मानाबाद - (१७.०), परभणी ३२.७ (१८.५), अकोला ३३.२ (१९.९), अमरावती ३२.० (१६.३), ब्रह्मपुरी ३५.५ (१६.६), बुलडाणा ३०.०(१७.४), चंद्रपूर ३३.० (१९.६), गडचिरोली ३३.६(-), गोंदिया ३३.२ (१७.०), नागपूर ३३.४ (१७.२), वर्धा ३३.२(१७.९), वाशीम ३२.०(१६.०), यवतमाळ ३१.० (१८.५).

 उद्या घेणार मॉन्सून देशाचा निरोप
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. २३) देशाच्या बहुतांशी भागांतून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ईशान्य भारत संपूर्ण बंगालचा उपसागर, गोवा, तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. उद्यापर्यंत (ता. २६) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने  वर्तविली आहे.  
 


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...