agriculture news in marathi, temperature increased, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तापमानात वाढ; पारा ३० अंशांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अंशत: ढगाळ आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पारा ३० अंशांवर पोचला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात आज (ता.२) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.  

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अंशत: ढगाळ आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पारा ३० अंशांवर पोचला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात आज (ता.२) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.  

राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. तर, ढगाळ हवामानामुळे विदर्भात मात्र पारा सरासरीच्या खाली आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाडाही जाणवत आहे.  मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमानही सरासरीच्या वर गेले असल्याने रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. नगर, जळगाव, सोलापूर, सांताक्रुज, अलिबाग, डहाणू, परभणी, नांदेड, वर्धा येथे ३० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत स.िक्रय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, उत्तर प्रदेश आणि ओडिशा परिसरावरील चक्राकार वारे, विषवृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस ओसरला आहे.

बुधवारपर्यंत (ता. ५) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला अाहे.  

शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.६, नगर ३३.०, जळगाव ३०.८, कोल्हापूर २७.८, महाबळेश्वर १९.२, मालेगाव २९.८, नाशिक २८.४, सांगली २९.६, सातारा २७.८, सोलापूर ३२.७, सांताक्रूझ ३०.६, अलिबाग ३१.२, रत्नागिरी २९.७, डहाणू ३१.१, आैरंगाबाद २९.५, परभणी ३०.१, नांदेड ३०.१, अकोला २८.६, अमरावती २६.०, बुलडाणा २६.२, चंद्रपूर २८.२, गोंदिया २८.५, नागपूर २८.१, वर्धा ३०.९, यवतमाळ २६.५. 

शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - कृषी विभाग) : 
कोकण : तळा ३०, दापोली ३६, बुरोंडी ३७, दाभोळ ४९, अंजर्ला ३८, पालगड ४१, वेळवी ४०, भरणे ३६, पाचल ३०, अंबोली ३५. 
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर ४७, तापोळा ७४, लामज ८७, आंबा ३२, चंदगड २१.
मराठवाडा : अदमपूर २०, उस्माननगर २२, कापसी २९, मांडवी २०, धर्माबाद २९. 
विदर्भ : रत्नारा ५४, दासगाव ७०, रावणवाडी ६७, कामठा ६०, काट्टीपूर ७२, कवरबांध ३०, सालकेसा ३०, पेरमिली ३८.

इतर अॅग्रो विशेष
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...