निफाड ११.४ अंशांवर; किमान तापमानात घट

cold
cold

पुणे ः राज्यातील कोरडे हवामान आणि उत्तर भारताकडून काही प्रमाणात वारे वाहू लागल्याने राज्यातील गारठ्यात चढ-उतार सुरू आहेत. खानदेशासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागात गारठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत पहाटेच्या गारठ्यात आणखी वाढ होणार असून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता.१९) सकाळी नाशिकमधील निफाड येथे ११.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात खानदेशातील धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, बुलढाणा, जालना या भागात झालेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला आहे. त्यातच जमिनीत अधिक असलेला ओलावा, यामुळे राज्यातील अनेक भागात गारठ्यात वाढ होऊ लागली आहे. खानदेशातील धुळे कृषी महाविद्यालय, निफाड, चंद्रपूर या भागात गारठा चांगलाच वाढला असून कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. सध्या पहाटे काही भागात धुके पडत असून उत्तर प्रदेश ते विदर्भ यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असल्याने विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. यामुळे राज्यातील काही भागात हवामान अंशत ढगाळ होत आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात चढउतार सुरू आहेत. कोकणात कोरडे हवामान असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला असल्याने किमान तापमान १६ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुढील काही दिवस तापमान या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात गारठ्यात आणखी वाढ होईल. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १३.० (२), अकोला १५.३ (२), अलिबाग २०.५ (२), अमरावती १५.४ (१), औरंगाबाद १३.५ (२), बीड १५.३ (२), बुलडाणा १५.० (१), चंद्रपूर ११.८ (-१), डहाणू २०.२, गोंदिया १२.२, जळगाव १४.२ (३), कोल्हापूर १८.० (३), महाबळेश्वर १३.४, मालेगाव १५.६ (४), धुळे कृषी महाविद्यालय १२.०, मुंबई २१.४ (३), नागपूर १२.४, नांदेड १६.० (४), नाशिक १३.६ (३), नवी मुंबई १६.५,  निफाड ११.४, उस्मानाबाद १५.४ (२), परभणी १४.७ (२), लोहगाव १५.८ (२), पाषाण १४.३ (३), पुणे १३.७ (३), रत्नागिरी २३.१(३), सांगली १७.८ (४), सातारा १४.६ (२), सोलापूर १७.६ (३), ठाणे २२.५, वर्धा १५.६ (२), यवतमाळ १६.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com