विदर्भात तापमान चाळिशीपार 

उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भाच्या काही भागांत झळा तीव्र होऊ लागल्याने कमाल तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत गेला आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भाच्या काही भागांत झळा तीव्र होऊ लागल्याने कमाल तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत गेला आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  मध्य महाराष्ट्रात असलेली चक्रीय स्थिती निवळून गेली आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाले असून, सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी येथे ३९.८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर येथे ३९.२, तर अकोला ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर किमान तापमानात काही अंशी चढउतार असून, किमान तापमान १४ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  मराठवाड्यात थंडी काही प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमानाची परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात १२.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. इतर भागांत १५ अंश सेल्सिअसच्यावर आहे. कमाल तापमानातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परभणी येथे ३७ सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी आणि उन्हाच्या चटक्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोलापूर येथे ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे. कोकणातही कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. सांताक्रूझ येथे ३८.१ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची, तर २०.६ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे.  गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१) 
  • ठाणे २२ 
  • अलिबाग २०.६ (१) 
  • रत्नागिरी २०.८ 
  • डहाणू २१.६ (२) 
  • पुणे १४.९ (१) 
  • नगर १५.९ 
  • जळगाव १३.२ (-३) 
  • कोल्हापूर १९.६ (१) 
  • महाबळेश्‍वर १७.४ (१) 
  • मालेगाव १७.८ (३) 
  • नाशिक १४.६ (१) 
  • निफाड ११.५ 
  • सांगली १८.५ (१) 
  • सातारा १६.७ 
  • सोलापूर २०.६ 
  • औरंगाबाद १९.७ (३) 
  • बीड १९.३ (३) 
  • परभणी १९.५ (१) 
  • परभणी कृषी विद्यापीठ १२.९ 
  • नांदेड १५ (२) 
  • उस्मानाबाद १९ 
  • अकोला १७.६ (-१) 
  • अमरावती १८.३ (-१) 
  • बुलडाणा २०.८ (२) 
  • चंद्रपूर १७.६ (-२) 
  • गोंदिया १५.६ (-२) 
  • नागपूर १७.४ 
  • वर्धा १७.८ 
  • यवतमाळ २१.५ (२) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com