agriculture news in Marathi temperature over 40 degree in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात तापमान चाळिशीपार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भाच्या काही भागांत झळा तीव्र होऊ लागल्याने कमाल तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत गेला आहे.

पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भाच्या काही भागांत झळा तीव्र होऊ लागल्याने कमाल तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत गेला आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्रात असलेली चक्रीय स्थिती निवळून गेली आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाले असून, सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी येथे ३९.८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर येथे ३९.२, तर अकोला ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर किमान तापमानात काही अंशी चढउतार असून, किमान तापमान १४ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

मराठवाड्यात थंडी काही प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमानाची परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात १२.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. इतर भागांत १५ अंश सेल्सिअसच्यावर आहे. कमाल तापमानातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परभणी येथे ३७ सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी आणि उन्हाच्या चटक्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोलापूर येथे ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे. कोकणातही कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. सांताक्रूझ येथे ३८.१ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची, तर २०.६ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१) 
  • ठाणे २२ 
  • अलिबाग २०.६ (१) 
  • रत्नागिरी २०.८ 
  • डहाणू २१.६ (२) 
  • पुणे १४.९ (१) 
  • नगर १५.९ 
  • जळगाव १३.२ (-३) 
  • कोल्हापूर १९.६ (१) 
  • महाबळेश्‍वर १७.४ (१) 
  • मालेगाव १७.८ (३) 
  • नाशिक १४.६ (१) 
  • निफाड ११.५ 
  • सांगली १८.५ (१) 
  • सातारा १६.७ 
  • सोलापूर २०.६ 
  • औरंगाबाद १९.७ (३) 
  • बीड १९.३ (३) 
  • परभणी १९.५ (१) 
  • परभणी कृषी विद्यापीठ १२.९ 
  • नांदेड १५ (२) 
  • उस्मानाबाद १९ 
  • अकोला १७.६ (-१) 
  • अमरावती १८.३ (-१) 
  • बुलडाणा २०.८ (२) 
  • चंद्रपूर १७.६ (-२) 
  • गोंदिया १५.६ (-२) 
  • नागपूर १७.४ 
  • वर्धा १७.८ 
  • यवतमाळ २१.५ (२) 

इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...