agriculture news in marathi, temperature rise slowly in state | Agrowon

थंडीची तीव्रता तीळ तीळ कमी...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर कमी होण्यास सुरवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर कमी होण्यास सुरवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, खांदेशातील धुळे, जळगाव या जिल्ह्यात अजूनही थंडी काही प्रमाणात कायम असून काही भागात अद्यापही किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आहे. निफाडपाठोपाठ धुळे कृषी महाविद्यालयात ७.६ अंश सेल्सिअसची एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या वर गेला आहे.

मराठवाडा व विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून किमान तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. कोकणात काही प्रमाणात असल्याने किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. कर्नाटकाचा उत्तर भाग ते राजस्थान यादरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या परिसरात असून ते समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे येत्या उत्तर मध्य महाराष्ट्र व कोकण या परिसरातील किमान तापमान वाढू लागले आहे. परिणामी राज्यातील किमान तापमानात
चढउतार होऊन पुढील काही दिवसात थंडी आणखी कमी होईल. त्यामुळे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही हळूहळू वाढ होण्यास सुरवात होईल.

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) १४.० (-३), अलिबाग १५.७ (-२), रत्नागिरी १६.० (-३), डहाणू १५.५ (-१), ठाणे १७.८, पुणे १०.२ (-१), जळगाव ९.४ (-२), कोल्हापूर १६.६ (-२), महाबळेश्वर १४.० (-१), मालेगाव १०.६, नाशिक ८.० (-२), निफाड ५.६, सांगली १३.१, सातारा ११.५ (-१), सोलापूर १५.३ (-१), औरंगाबाद १२.८ (१), बीड १४.४ (१), परभणी १५.० (१), नांदेड १४.० (१), अकोला १४.१, अमरावती १५.४ (१), बुलढाणा १४.५, चंद्रपूर १४.० (-१), गोंदिया ११.२ (-२), नागपूर १४.० (१), वर्धा १५.७ (२), यवतमाळ १५.४.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...