agriculture news in marathi, temperature variation in state, Maharashtra | Agrowon

किमान तापमानात चढउतार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे ः अरबी समुद्र व कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढउतार होत आहे. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे येथे १४.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः अरबी समुद्र व कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढउतार होत आहे. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे येथे १४.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

हवामान कोरडे असल्याने थंडीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील नगर, नाशिक, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील काही भागात चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत असली तरी, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात चढउतार सुरू आहे. 
कोकणातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात व कोकण गोव्याच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. 

बंगालचा उपसागर आणि श्रीलंकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग ते श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्र कर्नाटक व तमिळनाडूच्या दिशेने सरकत असून ते समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ व परिसर, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून आजपासून (ता. २) ते सोमवारपर्यत (ता. ५) कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

गुरुवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रुझ) २०.३, रत्नागिरी २०.७, पुणे १४.४, जळगाव १७.४, कोल्हापूर १८.८, महाबळेश्वर १४.८, मालेगाव १८.४, नाशिक १५.१, सांगली १५.९, सातारा १६.७, सोलापूर १८.१, औरंगाबाद १६.२, परभणी १७.९, नांदेड १६.०, अकोला २०.२, अमरावती २०.६, बुलढाणा १९.०, चंद्रपूर २१.२, गोंदिया २१.६, नागपूर १८.५, वर्धा १६.५, यवतमाळ १८.४

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...