विदर्भात उन्हाचा ताप कायम

विदर्भात उन्हाचा ताप कायम
विदर्भात उन्हाचा ताप कायम

पुणे : राज्यात वादळी पावसाच्या ढगांची छाया असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. विदर्भात मात्र उन्हाचा ताप कायम आहे. आजपासून (ता. २०) राज्याच्या तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांची वाढ होऊन, उन्हाचा चटका वाढणार आहे. तसेच विदर्भात ढगाळ हवामानास तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  दोन दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारपासून अकाशात ढग जमा होत असल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या जवळपास होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, नगर वगळता मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ अंशापेक्षा खाली तर, मराठवाड्यातही तापमान ३८ ते ४१ अंशांच्या दरम्यान होते. कोकणात तापमानाचा पारा ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे. तर विदर्भात मात्र अनेक ठिकाणी तापमान ४१ अंशांच्या पुढे आहेत. अमरावती, अकोला, वर्धा येथे ४३ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर सोलापूरसह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.   शनिवारी (ता. ६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८ (०.७), नगर ४१.४ (३.५), जळगाव ४२.८ (२.६), कोल्हापूर ३६.१ (-०.९), महाबळेश्वर ३२.५ (०.९), मालेगाव ४१.६ (२.६), नाशिक ३७.१ (०.०), सांगली ३७.१ (-१.०), सातारा ३८.२ (२.१), सोलापूर ३८.४ (-१.०), अलिबाग ३३.३ (१.९), डहाणू ३४.४ (२.४), सांताक्रूझ ३३.० (०.१), रत्नागिरी ३२.३ (०.४), औरंगाबाद ४१.० (३.४), नांदेड ४०.५ (०.८), उस्मानाबाद ३८.६ (०.९), परभणी ४०.५ (१.१), अकोला ४३.१ (३.३), अमरावती ४३.६ (३.८), बुलडाणा ३९.५ (३.३), बह्मपुरी ४२.० (२.६), चंद्रपूर ४१.८ (१.३), गडचिरोली ३९.४ (-०.८), गोंदिया ३९.८ (०.७), नागपूर ४२.६ (३.४), वाशीम ४०.८, वर्धा ४३.० (३.२), यवतमाळ ४१.५ (२.४). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com