Agriculture news in Marathi Temperatures continue to fluctuate | Agrowon

तापमानात चढ-उतार सुरूच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. आज (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. आज (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेल्या आहेत. आज (ता. २६) बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होणार असून, त्याच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. २८) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. 

दरम्यान, राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढला असतानाच, तर किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (१६.७), नगर - (१७.१), जळगाव ३३.२ (१७.०), कोल्हापूर ३२.३ (२०.९), महाबळेश्वर २७.५ (१३.१), मालेगाव ३०.४ (१६.६), नाशिक ३०.२ (१७.४), सांगली ३४.१(२०.१), सातारा ३२.६(१५.९), सोलापूर ३४.२ (१७.५), सांताक्रूझ ३२.८ (२२.८), डहाणू ३१.६ (२३.२), रत्नागिरी ३२.२ (२१.७), औरंगाबाद ३१.५ (१६.३), नांदेड ३२.८(१८.०), उस्मानाबाद ३१.२ (१९.०), परभणी ३२.५ (१८.२), अकोला ३३.२ (१८.३), अमरावती ३१.६ (१६.९), ब्रह्मपुरी ३४.८ (१७.१), बुलडाणा ३०.०(१७.७), चंद्रपूर ३२.६ (२०.४), गडचिरोली ३४.२(-), गोंदिया ३३.० (१७.८), नागपूर ३३.२ (१८.२), वर्धा ३३.०(१८.०), वाशीम ३३.०(१५.०), यवतमाळ - (१६.५).


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...