अक्राळेत लोकसहभागातून उभे राहतेय ज्ञान मंदिर

The temple of knowledge  stands out from the crowd in Akrale
The temple of knowledge stands out from the crowd in Akrale

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आत्तापर्यंत ३ लाख १० हजारांचा निधी संकलित केला आहे. जेवढी रक्कम जमा होईल, तेवढीच सह्याद्री फार्म्स या कामासाठी देणार आहे. फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे आणि राम बंधूचे हेमंत राठी यांच्या हस्ते नवीन शाळा इमारतीचे भूमिपूजन झाले. 

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे हे १६९० लोकसंख्येचे गाव आहे. येथे जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची ७ वी पर्यंत शाळा आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १६७ आहे. विद्यार्थी गुणवत्ता अतिशय चांगली आहे. मात्र, शाळा खोल्यांची अडचण होती. मोहाडी क्लस्टरअंतर्गत चालू असलेल्या ग्रामविकासाच्या कामात गावकऱ्यां‍नी शाळेच्या नवीन इमारतीचा विषय मांडला. मोहाडी क्लस्टरतंर्गत दिंडोरी तालुक्यातील १६ गावांचा विकास आराखडा बनवून त्यावर मागील एक वर्षापासून काम सुरू करण्यात आले. ''प्रोजेक्ट शिक्षा''अंतर्गत शाळांची सुधारणा करण्यात येत आहे.  

मागील ३ महिन्यांपासून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास समिती सदस्य घरोघरी जाऊन लोकवर्गणी जमा करत आहेत. अगदी ५०० रुपयांपासून ११००० पर्यंत ग्रामस्थांनी देणगी प्राप्त झाली आहे. शाळेसाठी जागा, त्याचा आराखडा बनवणे यावर देखील काम सुरू झाले. यामध्ये नवीन ८ खोल्या आणि ३ जुन्या अशी ११ खोल्यांची प्रशस्त शाळा बांधणीसाठी ४० लाखापर्यंत खर्च येणार आहे. गावातील नोकरदार मंडळीदेखील निधी उभारणीसाठी पुढाकार घेत आहेत. या वेळी फार्मचे विवेक नेमाडे, क्लस्टर समन्वयक सुरेश नखाते, प्रितिश कारे, सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

ग्रामविकासाचा 'मोहाडी क्लस्टर' पॅटर्न 

सह्याद्री फार्म्सच्या पुढाकाराने १६ गावांमध्ये मोहाडी क्लस्टरतंर्गत कामांत लोकसहभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यातून गावातून निधी उभारणी झाल्यानंतर तेवढीच रक्कम सह्याद्री फार्म्स सीएआर निधीतून देते. उरलेली रक्कम मग शासकीय योजना आणि ग्रामपंचायतीतून उभी करून ते काम पूर्ण केले जाते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com