Agriculture news in marathi, Temporary relief of dried crops in Aurangabad, Jalna, Beed, Osmanabad and Latur districts. | Page 2 ||| Agrowon

हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना तात्पुरता दिलासा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १४५ मंडळांत गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ३०, लातूरमधील २५, औरंगाबादमधील २६, जालन्यातील २०, तर बीडमधील ४४ मंडळांचा समावेश आहे. जालन्यातील परतू व उस्मानाबादमधील कळंब तालुक्‍यासह काही मंडळांतील अपवाद वगळता इतर मंडळांत तुरळक, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला.

उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १४५ मंडळांत गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ३०, लातूरमधील २५, औरंगाबादमधील २६, जालन्यातील २०, तर बीडमधील ४४ मंडळांचा समावेश आहे. जालन्यातील परतू व उस्मानाबादमधील कळंब तालुक्‍यासह काही मंडळांतील अपवाद वगळता इतर मंडळांत तुरळक, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी २६ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. त्यामध्ये औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्‍यातील प्रत्येकी २, कन्नड, गंगापूरमधील प्रत्येकी ५, पैठणमधील ७, वैजापूरमधील २, तर खुल्ताबाद तालुक्‍यातील एका मंडळाचा समावेश आहे. या मंडळांमध्ये १ ते ३५ मिलीमीटर दरम्यान पाऊस झाला. बनोटी मंडळात ३५ मिलीमीटर, अंबाई २४, लाडसावंगी १५,  सिद्धनाथ वडगाव मंडळात १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २० मंडळांत पाऊस झाला. यामध्ये जालना, परतूर  तालुक्‍यातील प्रत्येकी ४, बदनापूरमधील ३, अंबडमधील २, तर घनसावंगीमधील ७ मंडळांचा समावेश होता. परतूर तालुक्‍यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. या तालुक्‍यातील श्रीष्टी मंडळात सर्वाधिक ५८ मिलीमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ सातोना ५०, परतूर १०, कुंभारपिंपळगाव १७, तिर्थपूरी १६, आंतरवली टेंभी १६, घनसावंगी १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४४ मंडळांत तुरळक, हलका, तर काही मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बीड तालुक्‍यातील ११, पाटोदा, आष्टीमधील प्रत्येकी तीन, शिरूरकासार, वडवणीमधील प्रत्येकी २, माजलगावमधील ४, केज, परळीमधील प्रत्येकी ५, तर गेवराईमधील ९ मंडळांचा समावेश आहे. नेकनुर मंडळात सर्वाधिक ४४ मिलीमीटर, तर मांजरसुंभा मंडळात ४२, थेरला २०, अमळनेर १२, पाली १६, धोंडराई १६, जातेगाव १४, शिरूर कासार ३६, रायमोहा ११, कौडगाव बु. १२, माजलगाव १६,  दिंद्रुड ११, तालखेडा २३, विडा १८, हनुमंतपिंप्री २०, नांदूरघाट येथे १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २५ मंडळांत पाऊस झाला. त्यामध्ये लातूर, औसा, निलंगा तालुक्‍यातील प्रत्येकी ७, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील प्रत्येकी १, तर अहमदपूर तालुक्‍यातील २ मंडळांचा समावेश आहे. मुरूम मंडळात सर्वाधिक ४३ मिलीमीटर, चिंचोली बु. १२, भादा १८, किनीथोट १२, औसा १२,  निटूर १४, तर साकोळ मंडळात १२ मिलीमीटर पाऊस झाला.

उमरगा, परांड्याकडे पाठ

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३० मंडळांत पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये उस्मानाबादमधील ८, तुळजापूरमधील ७, लोहारा १, कळंब ६, भूम ५, तर वाशी तालुक्‍यातील ३ मंडळांचा समावेश आहे. कळंब तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक राहिला. कळंब मंडळात ४२, इटकूर ३५, शरढोण ३४, मोहा १७, गोविंदपूर ४३, भूम १२, वाशी १४, उस्मानाबाद ग्रामीण २१, तेर १४, ढोकी २०, केशेगाव १८, बेंबाळी १४, सालगरा २१, इटकळ १७, जळकोट मंडळात १२ मिलीमीटर पाऊस झाला. उमरगा, परंडा तालुक्‍याकडे पावसाने अजूनही पाठच फिरविलेली आहे. प्रदीर्घ खंडानंतर मंडळातील पिकांना थोडा आधार देण्याचे काम पावसाने केले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...
टॅंकर, चारा छावण्यांबाबत...पुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०१...
मुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावीपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये...
विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट...जायकवाडी, जि. औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील...
तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे समजून...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व...
नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही....
शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा :...अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे...नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या...